Director Dr. Vijay Waghmare Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity: कापसाचे वाण नाही तर जमीन हीच उत्पादकता वाढीत अडसर

Director Dr. Vijay Waghmare: देशात कापूस वाणांची कमतरता नाही, पण पूरक संशोधन आणि जमीन आरोग्यावर लक्ष दिल्यास कापसाची उत्पादकता वाढेल, असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: देशात उत्पादनक्षम कापूस वाणांची वानवा नाही, मात्र इतर पूरक संशोधनासह जमीन आरोग्यावर भर दिल्यास निश्‍चितच कापसाची उत्पादकता वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी ‘ॲग्रोवन’समवेत बोलताना व्यक्‍त केला.

डॉ. वाघमारे म्हणाले, की कापसाच्या उत्पादकता वाढीत अनेक घटक प्रभावी ठरतात. त्यातील संरक्षित सिंचन, त्याबरोबरच जमिनीचा कर्ब या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. महाराष्ट्रात सुमारे ४० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होत असताना त्यातील १५ लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. महाराष्ट्रात १५-१६ लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र उथळ आणि चुनखडीयुक्त जमिनीखाली आहे.

विदर्भात होणारी कापूस लागवड ही कोरडवाहू क्षेत्रातील असल्याने अधिक पाऊस किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात ती सर्वाधिक प्रभावित होते. या वर्षी मे महिन्यात पाऊस झाला. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी लगोलग पेरणी केली आणि जून मध्ये पावसाने खंड दिला तर काय? असा प्रश्‍न दरवर्षी उभा ठाकतो.

गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलामुळे झालेले परिणाम अनुभवले जात आहेत. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत मुसळधार पाऊस बरसतो. शिवारात पाणी साचते, यामुळे झाडाला खेळती हवा मिळत नाही. झाडातील पोषणद्रव्याच्या यंत्रणेवर त्याचा परिणाम होतो. कापसात सप्टेंबर ते ऑक्‍टोबर या कालावधीत फूल, बोंडधारणा होते.

बोंडाची वाढ आणि परिपक्‍व होण्याचा कालावधी ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर असतो. त्यामुळे साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यात व नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाणी मिळाले पाहिजे. मॉन्सूनच्या पावसाने या काळात खंड दिल्यास शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाचे स्रोत असावेच, असे अपेक्षित आहे. या पिकाला संपूर्ण हंगामात ५००-६०० मिलिमीटर पावसाची गरज असली तरी वितरण सुयोग्य पद्धतीने झाले तरच त्याचा परिणाम साधता येतो.

जमीन आरोग्यही दुर्लक्षित

पाण्याबरोबरच मातीची सुपिकता हा देखील उत्पादकतेवर प्रभाव करणारा घटक आहे. सध्या ०.२ ते ०.४ असा सेंद्रिय कर्ब आहे. तो १ टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर कापसाची उत्पादकता दुप्पट निश्‍चितच वाढेल. जमीन आरोग्यावर लक्ष दिल्याने केंद्रिय कापूस संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकांअंतर्गत हेक्‍टरी ५० क्‍विंटल उत्पादन मिळविता आले. नजीकच्या काळात संस्थेने हेक्‍टरी ३० क्‍विंटलपर्यंत मजल गाठली आहे.

पिकाची वाढ, फूल तसेच बोंडधारणा या कालावधीत पावसाचे नियोजनबद्ध वितरण झाले तर कापूस पिकातून अपेक्षित उत्पाकदता आणि उत्पन्नाचा पल्ला गाठणे शक्‍य होते. मात्र नजीकच्या काळात मॉन्सूनच्या पाण्याचे वितरण विस्कळीत पद्धतीने होत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम कापूस उत्पादकतेवर दिसून आला आहे.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT