
Jalgaon News : खानदेशात जामनेर तालुक्यात सर्वाधिक पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड झाली आहे. ही लागवड ३८ हजार हेक्टर एवढी आहे. त्यात पुढील काही दिवसात आणखी वाढ होईल, अशी स्थिती आहे.
खानदेशात सर्वाधिक कापूस लागवड करणारा तालुका म्हणून जामनेरची ओळख आहे. यंदाही ही ओळख टिकून आहे. परंतु जामनेरातही कापूस लागवडीत घट होईल, असा अंदाज आहे. परंतु ही घट फक्त चार ते पाच टक्क्यांनी होईल. जामनेरात खरिपाची पेरणी एकूण एक लाख हेक्टरवर केली जाते. त्यात कापूस अधिक असतो. परंतु यंदा कापूस लागवडीत किंचित घट होईल. त्याऐवजी मका व सोयाबीनचा पेरा वाढेल, अशी स्थिती आहे.
कापूस लागवड सुरूच आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात मका, चारा पडून होता. अनेकांच्या बाजरी मळणीला विलंब झाला. यामुळेदेखील कापूस लागवडीस उशीर झाल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे कापूस लागवड सुरूच आहे. अनेक शेतकरी शेतात मशागत, ठिबक अंथरणे आदी कामे करीत आहेत.
ही कामे आवरल्यानंतर त्यात कापूस लागवड केली जात आहे. परंतु पूर्वहंगामी कापूस लागवड १० ते १२ जूनपर्यंत सुरू राहील. नंतर ही लागवड कमी होईल. कारण उशिरा लागवड केल्यास पुढे त्यात किडी, रोगराई येते व कापूस वेचणीत अडचण येते. कापूस वेचणी विलंबाने सुरू होते. यामुळे पुढे रब्बी हंगामासही उशीर होतो. अनेक शेतकरी सध्या शेतात पूर्वमशागत, बांधबंदिस्तीची कामे करीत आहेत.
त्यात मे महिन्यात अनेक भागात पाऊस आला. याचाही परिणाम शेतात मशागत करण्यासंबंधी झाला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात जामनेरनंतर चाळीसगावात कापूस लागवड अधिक असते. तसेच अमळनेर, पारोळा, धुळ्यातील शिंदखेडा भागातही कापूस पीक अधिक असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.