Sustainable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Farming: शाश्‍वत शेतीसाठी जमिनीचे संवर्धन

Soil Conservation: शाश्वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता आणि आरोग्य राखणे अत्यावश्यक आहे. योग्य खत व्यवस्थापन, सेंद्रिय घटकांचे संवर्धन, पिक फेरपालट आणि शून्य मशागतीसारख्या उपाययोजनांमुळे जमिनीचे पोषण मूल्य वाढवून अन्न उत्पादनात शाश्वतता साधता येते.

Team Agrowon

कु. प्रणिता चिमटे

Soil Health: जमीन विविध भौतिक, सेंद्रिय आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार होते. जगभरातील जमीन आरोग्याच्या ऱ्हासामुळे कृषी उत्पादकता, पाण्याची उपलब्धता, जंगल आणि कुरण परिसंस्थांचे आरोग्य कमी झाले आहे. या घसरणींमुळे मानवी पोषणावर परिणाम झाला आहे. जगातील जैवविविधतेच्या सुमारे २५ टक्के भाग जमिनीमध्ये आढळतो. बहुतेक जमिनीमध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण कमी आहे,

जमिनीतील सेंद्रिय कर्ब सुमारे ०.५४ टक्का असते. पोषक तत्त्वांचा ऱ्हास आणि अयोग्य खतांचा वापर उत्पादकता कमी करते. जमिनीतील पोषक तत्त्वांची भरपाई करणे, माती परीक्षणानुसार खत वापर आणि सेंद्रिय घटक वाढवणे या सारख्या शाश्वत पद्धतींचा अवलंब आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कणांची रचना, भुसभुशीतपणा, निचरा उपलब्ध दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीची खोली, सूक्ष्मजीवांची संख्या या महत्त्वाच्या घटकांचे मूल्यमापन आणि देखभाल करण्यावर जमिनीची सुपीकता अवलंबून आहे.

व्यवस्थापन पद्धती

नांगरणी, मशागत कमी करावी. मातीची रचना जपण्यासाठी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी शून्य मशागतीचा अवलंब करावा.

वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी सतरा पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. कोणत्याही पोषक तत्त्वांची कमतरता पिकांच्या जीवनचक्रावर परिणाम करते. अचूक आणि संतुलित पोषक व्यवस्थापनासाठी मातीचे परीक्षण करावे, शिफारशीनुसार खतांचा वापर करावा.

योग्य स्रोत, योग्य दर, योग्य वेळी, योग्य जागी खतांचा वापर करावा. यामुळे पीक उत्पादनात वाढ, पर्यावरण संरक्षण होते, शाश्‍वतता वाढवते.

पीक अवशेष, शेणखत, हिरवळीचे खत आणि कंपोस्ट खत, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवून सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत करतात. यामुळे कृत्रिम खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकालीन जमिनीची सुपीकता सुधारू शकते.

आच्छादन पिके जमिनीची धूप कमी करतात.सच्छिद्रता, मातीचे एकत्रीकरण वाढवतात.

रासायनिक कीटकनाशकांपेक्षा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा.

विविध पिकांच्या फेरपालटामुळे कीटक आणि रोगांचे चक्र मोडते, पोषक तत्त्वांचे चक्र सुधारते आणि जमिनीची सुपीकता वाढते. या व्यतिरिक्त, वातावरणातील नायट्रोजन स्थिर करणाऱ्या शेंगायुक्त पिकांचे एकत्रीकरण केल्यास कृत्रिम खतांची गरज कमी होते.

जमिनीची सुपीकता, आरोग्य आणि जैवविविधता शाश्‍वतपणे वाढवण्यासाठी जमिनीचे भौगोलिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवले पाहिजेत. या दृष्टिकोनामुळे जागतिक अन्न सुरक्षा सुधारेल.

(लेखक मृदाशास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पीएच.डी. विद्यार्थी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT