Shetkari Karjmafi Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीत लाडकी बहीणचा अडथळा; आर्थिक ताण वाढल्याने कर्जमाफीला बगल

Farmers Issue : लाडक्या बहीण योजनेचा इतर योजनांवर परिणाम झाला नाही, असा दावा सरकारने न्यायालयात केला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक योजना यामुळे रखडल्या आहेत.

Anil Jadhao 

Pune News : लाडक्या बहीण योजनेचा इतर योजनांवर परिणाम झाला नाही, असा दावा सरकारने न्यायालयात केला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक योजना यामुळे रखडल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेली कर्जमाफीही लाडक्या बहीण योजनेच्या आर्थिक ताणामुळे झाली नाही. या योजनेचा ताण कमी होत नाही तोपर्यंत कर्जमाफी शक्य नाही, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची कर्जे थकल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खात्यात जमा झालेले लाभ किंवा माल विक्रीचे पैसे कर्ज खात्यात वळते केले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. थकबाकीमुळे नविन कर्ज तर मिळत नाही. पण गेल्या दोन वर्षांपासून शेतीमालाचे बाजारभाव कमी आहेत. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. मग कर्ज कसे भरायचे? अशा विवंचनेत शेतकरी आहेत. एकंदरीत कर्जामुळे शेतकरी एका चक्रव्यवहात अडकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे.

कर्जमाफीची मागणी शेतकरी तसे गेल्या वर्षभरापासून करत आहेत. लोकसभा निवडणुकीतही ही मागणी पुढे आली होती. पण विधानसभा निवडणूकीत या मागणीने जोर धरला. लोकसभेत फटका बसल्यानंतर महायुतीनेही कर्जमाफीचे आश्वासन दिले. आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाल्याने कर्जमाफीच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र सरकार स्थापन होऊन आता दोन महीन होतील. तरीही कर्जमाफी झाली नाही. 

सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल आहे. पण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, असे काही अधिकाऱ्यांनी सांगतिले. त्यातच लाडक्या बहीण योजनेचा आर्थिक ताण वाढला आहे. लाडक्या बहीणींना सध्या महीन्याला किमान ३७०० कोटी रुपये द्यावे लागत आहेत. हा खर्च महिन्याला येतो. तसेच महिन्याला १५०० रुपयानुसार वर्षाला किमान ४२ हजार कोटी रुपये खर्च येतो. आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपये दिल्यास ६० हजार कोटी रुपयांचा ताण येणार आहे. 

लाडक्या बहीण योजनेचा एवढा ताण आल्याने सरकार कर्जमाफीला बगल देत असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीही ६० ते ७० हजार कोटींच्या दरम्यान निधी लागेल. आता लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या जास्त खर्चाच्या योजना तिजोराती खडखडाट असताना सरकार देऊ शकत नाही. त्यामुळे सरकार कर्जमाफीवर बोलत नाही. तसेच तजवीज झाल्याशिवाय कर्जमाफी मिळू शकणार नाही. 

सरकार लाडक्या बहीण योजनेचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त महीलांना योजनेतून बाहेर काढत आहे. त्यासाठी नियमांच्या आधारवर पडताळणी केली जात आहे. लाडक्या बहीण योजनेचा ताण कमी झाल्यानंतर निधीची तजवीज झाल्यानंतर सरकार कर्जमाफी जाहीर करेल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. पण या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देऊ शकणार नाही. म्हणजेच कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागेल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Disease: झूनोसिस आजारांकडे नको दुर्लक्ष

Heavy Rainfall: राज्यात पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक शहरे, गावांमध्ये पूरस्थिती

Tractors Regulations: नव्या निर्णयांचा ट्रॅक्टरवर घाला

Heavy Rain Crop Loss : राज्यात १० लाख एकरवरील पीके पाण्याखाली; २ दिवसांत नुकसानीचे पंचनामे होणार: अर्थमंत्री अजित पवार

Forest Conservation: वन संवर्धनाचे गांभीर्य कधी?

SCROLL FOR NEXT