Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Farmer Loan Waive : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

MSP Act : राज्य सरकार पुन्हा सत्तारुढ होण्यासाठी शासकीय तिजोरी रिकामी करीत आहे. शेतमालासाठी हमीभावाचा कायदा नाही.
Published on

Shirpur News : शेतकऱ्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, १२ हजार पात्र वनहक्क जमीनधारकांना कापूस व सोयाबीनच्या नुकसानापोटी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान द्यावे, जातीनिहाय जनगणना त्वरित सुरु करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवावी, या प्रमुख मागणीसाठी येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सहयोगी संघटनांतर्फे शुक्रवारी (ता.३०) येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Farmers Protest
Farmers Loan Waive : शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार? सरकार सकारात्मक असल्याची चर्चा

भाकपसह महाराष्ट्र राज्य किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन, आशा व गटप्रर्वतक संघटनेच्या वतीने मोर्चाचे आवाहन केले होते. यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.हिरालाल परदेशी, भाकपचे तालुका सचिव अ‍ॅड. संतोष पाटील, ज्येष्ठनेते अर्जुन कोळी, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सतीलाल पावरा, नारसिंग पावरा, रामचंद्र पावरा आदींनी सरकारच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला.

Farmers Protest
Loan Interest Waive Scheme : मुदतीत कर्जफेड केल्यास होणार व्याज माफ ; राजस्थान सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

राज्य सरकार पुन्हा सत्तारुढ होण्यासाठी शासकीय तिजोरी रिकामी करीत आहे. शेतमालासाठी हमीभावाचा कायदा नाही. विमा कंपन्या शेतकरी आणि सरकारची लूट करीत आहेत. शेतमालाचे नुकसान नुकसान सुरु असतांना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

वनजमिनीचा अद्यापही सातबारा दिला जात नाही. नाशिकच्या अप्पर आयुक्तांकडील बरेच वनदावे फेटाळण्यात आले आहेत. आशा व गटप्रर्वतकांना हक्काचे मानधन मिळत नाही. , असे आरोप करण्ययात आले. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com