Orange  Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticide Label Claim : संत्र्यामध्ये ‘लेबल क्‍लेम’ असलेल्या कीडनाशकांचा अभाव

Pesticide Ban News : दरवर्षी ही समस्या उद्‍भवत असताना या पिकात ‘लेबल क्‍लेम’युक्त कीडनाशके कमी असल्याचे वास्तव समोर आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : आंबिया बारातील संत्र्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर गळती झाली. दरवर्षी ही समस्या उद्‍भवत असताना या पिकात ‘लेबल क्‍लेम’युक्त कीडनाशके कमी असल्याचे वास्तव समोर आले आहे.

डिसेंबर, जानेवारीत आंबिया बहरासाठी जिवाचे रान करून संत्रा बागायतदार आंबिया बहराचे नियोजन करतो. या माध्यमातून दर्जेदार फळे मिळावी व त्याव्दारे वर्षभराचे अर्थकारण चालावे, असा उद्देश असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून संत्र्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडली आहे.

मोर्शी, वरुड या तालुक्‍यात सर्वाधिक ७० हजार हेक्‍टर संत्रा लागवड आहे. त्यावर प्रक्रिया करणारे प्राथमिक स्तरावरील उद्योग आणि बाजारपेठ विकसित झाल्याने हजारो हातांना रोजगार मिळत हंगामात एक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.

इतकी मोठी आर्थिक उलाढाल असताना गेल्या काही वर्षांपासून जास्त, तर कधी कमी पावसाचा फटका बसल्याने संत्रा बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे संत्रा फळांची गळ होत आहे. त्यामुले शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांकडून कृषी केंद्रावर जात बुरशीनाशके व कीटकनाशकांची मागणी होते. परंतु संत्र्यामध्ये ‘लेबल क्‍लेम’ असलेल्या निविष्ठा अत्यंत कमी आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना कोणते घटक द्यावेत, अशा विवंचनेत कृषी व्यावसायिक राहतात.

‘लेबल क्‍लेम’ नसल्याने पर्यायी घटक दिल्यास आणि त्याचे दुष्परिणाम समोर आल्यास व्यावसायिकांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होते. परिणामी, डॉक्‍टरप्रमाणेच शास्त्रज्ञांकडूनच प्रिस्क्रिप्शन दिले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

संत्रा पिकात लेबल क्‍लेम असलेल्या कीडनाशकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अन्य पिकांवर प्रभावी ठरणारे घटक संत्रा बागायतदारांना दिले जातात. त्यातून काही चुकीचे घडल्यास आमच्यावर दोषारोप होते. परिणामी, मेडिकल व्यवसायाप्रमाणे शास्त्रज्ञांनी अधिकृत चिठ्ठीवर शिफारस लिहून दिल्यास तेच घटक दिले जातील. म्हणजे आम्हाला दोष दिले जाणार नाहीत.
- मिलिंद इंगोले, कृषी सेवा केंद्र व्यावसायिक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT