Agriculture Wages Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Wages : शेतीमालाच्या दर घसरणीमुळे मजुरीचे दर स्थिर

Agriculture Market : मजुरीचे दर यंदा स्थिर आहेत. मध्यंतरी जळगाव, धुळ्यातील काही गावांत मजुरी दरवाढीसाठी काही मजुरांनी रेटा लावला होता. परंतु शेतीमालाचे दर घसरत आहेत. कापसाला कवडीमोल दर मिळाला आहे. परिणामी मजुरीचे दर स्थिर आहेत.

Team Agrowon

मजुरीचे दर यंदा स्थिर आहेत. मध्यंतरी  जळगाव, धुळ्यातील काही गावांत मजुरी दरवाढीसाठी काही मजुरांनी रेटा लावला होता. परंतु शेतीमालाचे दर घसरत आहेत. कापसाला कवडीमोल दर मिळाला आहे. परिणामी मजुरीचे दर स्थिर आहेत.

यंदा खरिपात नुकसान झाले, पण पीकविमा व इतर भरपाई कुठेही मिळाली नाही. कापसाला दर कमी मिळाला. रब्बी हाती येत आहे, पण पाऊस धुमाकूळ घालत आहे. काही भागात पावसाळी वातावरण आहे. शेतीमालाचे दर पडले आहे. कलिंगड, कांदा, हरभरा, सोयाबीन, तूर आदी पिकांना दर नाहीत. दुसरीकडे उत्पादन खर्च वाढत आहे.

मजुरी दर कसे वाढविणार, कारण शेतमालाचे दर गेले दोन वर्षे झपाट्याने घटले आहेत, अशा समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. शेतकरी कमी व अधिक पावसाने नुकसान सहन करीत आहेत. २०२३ मध्ये कमी पाऊस झाला. २०२४ मध्ये अतिपाऊस झाला. आता २०२५ मध्ये रब्बी हाती येतानाच शेतमालाचे दर कमी झाले. खते, बियाण्यांचे दर वधारत आहेत.

यंदा किंवा २०२४-२५ मध्ये कापसाचे उत्पादन एकरी बागायतीला तीन व कोरडवाहूसाठी अर्धा क्विंटल एवढेच आले. मका, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके शेतातच अतिपावसात हातची गेली. त्यांची माती झाली.  केळी व पपई उत्पादक वगळता इतर शेतमालास दर मिळालेच नाहीत. ज्वारी, बाजरीला १८००, मक्याला १८०० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी यंदा रब्बीसंबंधी मिळाला आहे.

नैसर्गिक समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. खतांची दरवाढ सुरूच असते. वादळ, पाऊस या समस्यादेखील आवासून उभ्या आहेत. अशात मजुरीचे दर कसे वाढविणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरीच कर्जबाजारी होत आहेत. शासनाने कर्जमाफी नाकारली आहे, अशी समस्यादेखील शेतकऱ्यांनी मांडली आहे. हमीभाव फक्त जाहीर होतात, पण ते शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाहीत. शेतकऱ्यांची वित्तीय स्थिती लक्षात घेवून कुठल्याही मागण्या केल्या पाहीजेत, असा मुद्दा शेतकरी  उपस्थित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: मराठवाड्यात पाऊस, विदर्भात उष्णतेचा इशारा; मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणाला उकळी, गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरु, ठराव दाखल करण्याची तारीख ठरली

Water Scarcity: सांगलीत खानापूर तालुक्यात सहा गावांत पाणीटंचाई

Hatnur Dam Water Release: ‘हतनूर’मधून विसर्ग; अनेक गावांना दिलासा

Summer Crop Sowing: हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीत ६ हजार ७०२ हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT