Groundwater Shortage: खानापूर तालुक्यातील रेवणगाव, ऐनवाडी, कुर्ली, घाडगेवाडी आणि जखीनवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होऊ लागली आहे. प्रशासनाने रेवणगाव आणि ऐनवाडी येथे कूपनलिका अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय केली आहे..दरम्यान, कुर्ली, घाडगेवाडी आणि जखीनवाडी येथे कूपनलिका अधिग्रहणासाठी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी दिली..Water Scarcity: पुणे जिल्ह्यात पाण्याचे स्रोत आटल्याने ९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा.तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या तीन ते चार दिवसांनी एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, त्याचा परिणाम बागायती पिकांवरही होत आहे. टेंभू योजनेच्या पाण्यामुळे काही गावांतील तलाव आणि सिमेंट बंधारे भरल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे..प्रशासनाने रेवणगाव, घोटी खुर्द, ऐनवाडी, जखीनवाडी, घाडगेवाडी (कुर्ली), वासुंबे, मेंगाणवाडी, जाधववाडी, बेणापूर, वलखड, कुर्ली, धोंडेवाडी, गार्डी, गोरेवाडी, मोही आणि रामनगर या १६ गावांसाठी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. त्यापैकी रेवणगाव, ऐनवाडी, कुर्ली, घाडगेवाडी आणि जखीनवाडी येथे प्रत्यक्ष टंचाई निर्माण झाली आहे..Parbhani Water Scarcity: चार लघू सिंचन तलाव आटले.गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शंकर झेंडे, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे, सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी रेवणगाव व जखीनवाडी या गावांना भेट देऊन सार्वजनिक विहिरींची पाहणी केली. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या..पाणीटंचाईग्रस्त गावांना भेट देऊन सार्वजनिक विहिरींची पाहणी केली. नागरिकांना वेळेत पाणी मिळावे यासाठी कूपनलिका अधिग्रहणासह अन्य उपाययोजनांच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, खानापूर. पंचायत समिती, विटा..खानापूर तालुक्यातील संभाव्य १६ गावांसाठी पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.- सुवर्णा भोसले, सभापती, खानापूर पंचायत समिती, विटा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.