Maharashtra Weather Update: माॅन्सूनची वाटचाल आजही थबकली होती. मात्र माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. .माॅन्सूनची वाटचाल आजही जैसे थे होती. मॉन्सूनने श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग,नैॡत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत अरबी समुद्र, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. .Heat Wave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा.राज्यात पुढील ५ दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदीया आणि यवतमाळ जिल्ह्यात काही पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल आहे. .Weekly Weather: कमाल आणि किमान तापमानात घट सुरू.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक तसेच सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.