Maize Rate : दरातील घसरणीमुळे मका विक्रीसाठी घाई

Maize Market : मका दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर मका उत्पादकांकडून विक्रीवर भर दिला जात आहे.
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

Amravati News : मका दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर मका उत्पादकांकडून विक्रीवर भर दिला जात आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.७) अचलपूर बाजार समितीत मक्‍याची विक्रमी चार हजार पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. हा अपवाद वगळता मका आवक रोज सरासरी दहा ते १५ हजार पोते होत असल्याची माहिती अचलपूर बाजार समिती सभापती राजेंद्र गोरले यांनी दिली.

Maize Market
Maize Market: निवडणुकीत शेतकरी शेतीमालाचे भाव लक्षात ठेऊनच मतदान करणार

अचलपूर लगत असलेल्या मेळघाट परिसरात मोठ्या क्षेत्रावर मका लागवड होते. पारदर्शी व्यवहार त्यासोबतच नगदी चुकारे होत असल्याने मध्य प्रदेशसह मेळघाटातील शेतकरी मका विक्रीसाठी अचलपूर बाजार समितीत विक्रीवर भर देतात. गेल्या अनेक वर्षांपासून यात सातत्य आहे. त्यामुळेच हंगामात बाजारातील मका आवक वाढती राहते.

Maize Market
Maize Seeds Rate : रब्बीसाठी मका बियाण्याचे दर यंदा कंपन्यांनी वाढविले

यंदा देखील मका हंगाम सुरू असून अचलपूर बाजार समितीत रोजची आवक १० ते १५ हजार पोते इतकी आहे. त्यातच मक्‍याचे दर तीन हजार रुपयांवरून २२५० ते २३०० रुपयांवर आले आहेत. यापुढील काळात त्यात आणखी घट होण्याची भीती मका उत्पादकांना भेडसावत आहे. याच भीतीतून गुरुवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी आणला. सुमारे ४० हजार पोत्यांची आवक एकाच दिवशी नोंदविण्यात आली. पब्लिक रिलेशन्स

मेळघाट आणि लगतच्या मध्य प्रदेशातील गावांमधून मका आवक वाढत आहे. दररोज सुमारे १० ते १५ हजार पोते आवक असताना गुरुवारी त्यात अचानक वाढ होत ती ४० हजार पोत्यांवर पोहचली.
राजेंद्र गोरले, सभापती, बाजार समिती, अचलपूर, अमरावती.
पशुखाद्यात मक्‍याचा वापर होतो. मका दरात घसरण होत असली तरी पशुखाद्याच्या दरात कंपन्यांकडून कोणतीच कपात करण्यात आली नाही. खऱ्या अर्थाने अशा प्रकरणात सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे. मका, सोया पेंडचे दर वाढले की कंपन्यांकडून पशुखाद्याचे दर तत्काळ वाढविले जातात.
रामनाथ वदक, पशुपालक, रा. निमगावजाळी, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com