Gadhinglaj Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Gadhinglaj Sugar Factory : गडहिंग्लज कारखान्याची साखर रोखणार, कामगार संघाकडून पोलिसांना निवेदन

Gadhinglaj Sugar : भविष्य निर्वाह निधी आणि थकीत पगारासाठी कारखान्याच्या गोदामातील साखर पोती बाहेर न सोडण्याचा इशारा दिला आहे.

sandeep Shirguppe

Gadhinglaj : गडहिंग्लज तालुक्यातील हरळीच्या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा, थकीत पगार आणि रिटेन्शन अलाऊन्स न मिळाल्यामुळे साखरेची विक्री रोखण्याचा इशारा साखर कामगार संघातर्फे प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

भविष्य निर्वाह निधी आणि थकीत पगारासाठी कारखान्याच्या गोदामातील साखर पोती बाहेर न सोडण्याचा इशारा कामगारांनी यापूर्वीच दिला आहे. दरम्यान, कारखान्याने साखर विक्रीची निविदा काढली असून, आज (शुक्रवारी) निविदा उघडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.

निवेदनात म्हटले आहे, ११ एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२३ अखेरचा कामगारांचा पगार थकीत आहे. ऑक्टोबर २०२० ते २०२३ अखेरची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कारखान्याने भरलेली नाही. हंगामी कामगारांना तीन वर्षांचा रिटेन्शन अलाऊन्स व प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळालेली नाही.

जुलै २०२३ मध्ये विविध मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यावेळी साखर उत्पादन होऊन विक्री सुरू होईपर्यंत ६० टक्केप्रमाणे पगार अॅडव्हान्स घ्यावा, अशी विनंती व्यवस्थापनाने केली होती. कामगारांना ती मान्य नसतानाही व्यवस्थापनाने ६० टक्केप्रमाणे पगार अदा केला. कारखान्याच्या हितासाठी कामगारांनी तो तात्पुरता स्वीकारला आहे.

गेल्या गळीत हंगामातील साखरेची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे एप्रिल २०२४ पासून १०० टक्के पगार व मागील थकीत पगार आणि शिल्लक ४० टक्के पगार देणे आवश्यक आहे. सध्या कारखान्याकडे १ लाख ५० हजार क्विंटल साखर शिल्लक असून, त्याची विक्री सुरू आहे. त्यामुळे कामगारांच्या संपूर्ण देण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा साखरेची विक्री थांबवावी लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

शिष्टमंडळात कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, सहसचिव अरुण शेरेगार, राजेंद्र कोरे, सुनील आरबोळे, सुरेश कबुरे, सोमनाथ घेज्ञ्जी, चंद्रकांत चौगुले यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Akola Agriculture University: विकसित भारताचा मार्ग कृषी क्षेत्रातून विस्तारतो

Sugarcane Rate Issue: ऊसदर जाहीर करा; अन्यथा मुक्काम आंदोलन

Ativrushti Madat: अतिवृष्टिग्रस्तांसाठी २५४० कोटी मदत

Banana Price: आवक घटल्याने खानदेशात केळी दर स्थिर

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात

SCROLL FOR NEXT