Maharashtra Politics : राज्यात आघाडीला ३० ते ३५ जागा मिळणार : शरद पवार

Loksabha 2024 Update : ‘‘या वेळेस लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना मिळून ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संघटनेला समर्थन देत आहेत,’’
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Satara News : ‘‘या वेळेस लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना मिळून ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संघटनेला समर्थन देत आहेत,’’ असे स्पष्ट मत खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केले.

Sharad Pawar
Sangli Loksabha 2024 : सांगली लोकसभेत मतदानाचा टक्का घटला

खासदार शरद पवार गुरुवारी (ता.९) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. त्या वेळी त्यांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला.

‘‘राज्यातील चित्र काय असेल,’’ यावर पवार म्हणाले, ‘‘या वेळेस आमची खासदारांची संख्या ३० ते ३५ च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. कारण लोकांना बदल पाहिजे आहे,’’ असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदी व राज ठाकरे एकत्र येत आहेत, यावर शरद पवार म्हणाले, ‘‘बघूया काय होते ते. मोदींना कोणा कोणाची मदत हवी आहे, हे यातून दिसत असून त्यांचा आत्मविश्‍वास कुठे गेलाय हेही समजत आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics : विरोधकांकडे आरोप, शिव्याशाप; तर आमच्याकडे काम आहे

पहिल्या तीन टप्प्यांत झालेले मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. राज्यात तीन टप्पे झाले, यामध्ये कमी मतदान झाले आहे,’’ यावर शरद पवार म्हणाले, की पहिल्या, दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे असे दिसते. कारण मोदींचा सूर बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा थेट उल्लेख केला. धर्मांधवादी विचार घेऊनच काहीतरी बदल होईल, अशी शंका त्यांच्या मनात असावी, असेही ते म्हणाले.

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार स्वत:च सर्व निर्णय घेतात. पण ते इतरांना सांगताना पक्षाने निर्णय घेतल्याचे दाखवतात,’’ अशी टीका अजित पवारांनी केली होती. यावर शरद पवार म्हणाले, की त्यांनी त्यांचा पक्ष नीट चालवावा, असा फटकारा त्यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com