Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : कापसाच्या वेचणीसाठी मिळेनात मजूर

Labor Shortage : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी खुरपणी, वखरणी, औषधाची फवारणी, खतांचा डोस या पिकांना दिला आहे.

Team Agrowon

Latur News : तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झाले. आता सर्व शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी वेचणीला आल्याने मजूर मिळत नाही. अन् शेतात कापूस वेचणीविना उभाच आहे. अनेक शेतकऱ्यांना परिवारासह पांढऱ्या सोन्याची वेचणी करावी लागत आहे.

तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी खुरपणी, वखरणी, औषधाची फवारणी, खतांचा डोस या पिकांना दिला आहे. त्यामुळे पिके चांगली आली होती. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

यातून वाचलेली पिके एकाच वेळी काढणीला आली आहेत. त्यामुळे कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीत परिणामी अनेक शेतामध्ये कापूस वेचणी अभावी तसाच पडून आहे. कापूस वेचणीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी बाहेरगावातून मजूर आणावे लागत आहेत. मजुरांना प्रति किलो दहा रुपये द्यावे लागत आहेत. मजुरीचे दरही वाढलेले आहेत. यात एक क्विंटल कापसासाठी एक हजार रुपये मजुरी मोजावी लागत आहे. शिवाय ने-आण करण्यासाठी वाहन द्यावे लागत आहे. त्यामुळे कापसाचे पीक यंदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.

रब्बी हंगामात वाढले खतांचे दर

रब्बी हंगामाच्या ऐन सुरवातीलाच रासायनिक खताचे दर वाढले आहेत. प्रति पोत्यामागे सरासरी १०० ते १७७ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT