Kumbi Kasari Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Kumbi Kasari Sugar Factory : कुंभी कासारी साखर कारखान्याचा उच्चांकी ३२०० रुपये दर, कोल्हापुरात उसाची पळवापळवी होणार

sandeep Shirguppe

Kolhapur Sakhar Karkhana News : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने एकरकमी एफआरपी जाहीर करत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ३ हजार रुपये तर काही कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये दर दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक रिकव्हरी देणारा साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या कुंभी कासारी साखर कारखान्यांने मात्र यंदा ३ हजार २०० रुपये दर दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे.

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे २०२३- २०२४ साठी उचल प्रतिटन ३ हजार २०० रुपये देत असल्याची माहिती अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. हंगाम २०२३ -२०२४ करिता ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

यंदा हंगामात कारखान्यास लागण व खोडवा धरून ११ हजार २३७ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली. या वर्षी पाऊस कमी असल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता असून ऊस उत्पादनात घट होऊन ऊस उपलब्धता कमी होईल, असा अंदाज आहे. कारखाना गळिताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस उत्पादकांनी पिकविलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे; असे नरके यांनी आवाहन केले.

कारखान्याने हंगाम २०२२ २०२३ ची एफआरपी आदा केली आहे. कारखाना ऊस उत्पादकांना दरमहा ५ किलो साखर शेअर्सपोटी आणि ऊस पुरवठाधारकांना टनेजपोटी प्रतिटन २ किलो साखर सवलतीत देण्यात येते. सवलतीतील साखरेचा विचार करता इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतिटन ८० ते १०० जादा ऊस उत्पादकांना लाभ मिळतो. या वेळी उपाध्यक्ष विश्वास पाटील, संचालक मंडळ, सदस्य, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते.

स्वाभिमानीच्या मागणीमुळे ऊस तोडण्या रद्द

राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून राज्यातील हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले, पण ‘स्वाभिमानी’ने तत्पूर्वीच ज्या ठिकाणी तोडी चालू आहेत त्या रोखणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडणे, ती पेटवणे असे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनानेच यात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सध्यातरी या तोडग्यावर निर्णय झाला नाही. परंतु पुढच्या काही दिवसांत ही पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेऊ, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ऊस तोडणी सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. शिरोळ हातकणंगले तालुक्‍यात, तर एखाद दुसऱ्या कारखान्यानेच ऊसतोडणी सुरू होती. काही ठिकाणी साखर अडवणे, ट्रॅक्‍टर अडवणे आदी प्रकार सुरू असल्याने कारखान्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT