Marathwada Water Issue : जायकवाडीत पाणी सोडण्याची प्रतीक्षा कायम

Marathwada Water Crisis : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणसमूहातून मराठवाड्यासाठी हक्काचे ८.६० टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे आदेश काढण्यात आले.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Chhatrapti Sambhajinagar News : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणसमूहातून मराठवाड्यासाठी हक्काचे ८.६० टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे आदेश काढण्यात आले. या आदेशाचे उचित पालन होण्यासाठी व सोडलेला विसर्ग जायकवाडी धरणामध्ये नियंत्रितपणे येण्यासाठी व संनियंत्रणासाठी तीन पथकांसह प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्णयाला जवळपास चार दिवस लोटले असून, आता हे पाणी कधी सोडले जाणार याची प्रतीक्षा आहे.

गोदावरी नदीवरील धरण समूह व नदी क्षेत्रातील पाण्यासाठी नियुक्त पथक क्रमांक १ चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता विनायक नखाते, मुळा धरण समूह व नदीक्षेत्रासाठी स्थापन पथक क्रमांक २ च्या प्रमुख म्हणून श्रीमती मयूरा जोशी, तर प्रवारा धरण समूह व नदीक्षेत्र साठीच्या पथक क्रमांक ३ चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता पी. बी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Water Crisis
Marathwada Water Issue : जायकवाडीत सोडणार ८.६० टीएमसी पाणी

या पथकाकडे पाणी सोडण्यासंदर्भात योग्य ते नियोजन करणे, अंमलबजावणी करणे, संबंधित अधिकारी कर्मचारी यांना आदेश देणे, संनियंत्रण करणे व त्याचा एकत्रित अहवाल वेळोवेळी महामंडळास व शासनास सादर करणे या बाबतची जबाबदारी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांची आहे.

या बाबत विभागीय आयुक्त नाशिक, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, तसेच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अहमदनगर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर यांना पूर्वकल्पना देऊन त्यांचे सहकार्य घ्यावे, त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, असेही आदेशात नमूद आहे.

आता त्यांच्याकडून पाणी सोडण्याबाबत कसे व केव्हा नियोजन केले जाते हा प्रश्‍न आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी वरच्या धरणातून समन्यायी पद्धतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी मराठवाडा पाणी परिषदेकडून सातत्याने करण्यात आली होती.

Water Crisis
Marathwada Water Crisis : पाणीसाठे वाढवीत आहेत चिंता; ३६ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत जायकवाडी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पाणी सोडण्याविषयी निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यासंदर्भात सोमवारी (३० ऑक्टोबर) जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणातून ८.६० टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे आदेश महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. रा. तिरमनवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले होते.

किमान ५.८ टीएमसी पाणी पोहोचण्याची आशा

आदेशानुसार पाणी केव्हा सोडले जाते याची प्रतीक्षा यंत्रणेला आहे. तूर्त मराठवाड्यातील यंत्रणेकडे पाणी सोडले जात असल्याबाबत किंवा अडचणींबाबत गुरुवारी (ता. २) दुपापर्यंत कुठलीही माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विसर्गानंतर किमान ३० टक्के अपव्यय लक्षात घेऊन ५.८ टीएमसी पाणी किमान जायकवाडीत पोहोचेल अशी आशा मराठवाड्यातील यंत्रणेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com