KVK  Agrowon
ॲग्रो विशेष

KVK Award : उत्कृष्ट विस्तार कार्यासाठी नागपूर ‘केव्हीके’चा गौरव

Team Agrowon

Nagpur News : जिल्ह्यातील शेतीक्षेत्राशी संबंधित समस्या आणि त्यास अनुरूप तंत्रज्ञान विस्तार कार्यावर सीआयसीआर संचलित केव्हीकेकडून भर देण्यात आला होता. त्याची दखल घेत केव्हीकेला जुनागड (गुजरात) येथे सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कापूस संशोधन संचालित नागपूर केव्हीकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रक्षेत्र चाचण्या, प्रथम रेषीय प्रात्यक्षिक, प्रक्षेत्र दिवस, शेतकरी मेळावे, निविष्ठा वाटप, हवामान आधारित कृषी सल्ला, विजेपासून संरक्षणात्मक बचाव, एकात्मिक शेती पद्धती मॉडेल, शेतकरी प्रशिक्षण यांसह इतर विविध विषयांवरील तांत्रिक कार्यशाळांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेत त्यांच्या मागणीनुसार देखील प्रशिक्षण व मेळाव्यांचे आयोजन होते. उत्पादनात स्थैर्यता राहावी याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने एक हेक्‍टरवरील फायदेशीर शेतीपद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. त्याच्या प्रसारावर देखील संस्थेकडून भर देण्यात आला आहे.

केव्हीकेद्वारा रोगमुक्‍त संत्रावर्गीय फळांची रोपनिर्मितीला देखील प्रोत्साहन दिले जात आहे. भाजीपाल्याचे मूल्यवर्धन त्यासोबतच सेंद्रिय शेती प्रकल्प देखील राबविला जात आहे. किसान सारथी सेवेच्या माध्यमातून ६६ हजार शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सल्ला दिला जातो.

शेतीमाल प्रक्रियेला चालना मिळावी याकरिता युवक-युवतींसाठी रोजगारक्षम प्रशिक्षणही आयोजित केले जातात. परिणामी दर वर्षी सुमारे २५ हजारांवर शेतकरी केव्हीकेला भेट देतात. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण व्हावे याकरिता हंगामात केव्हीके तज्ज्ञ देखील शेतकऱ्यांच्या शिवाराला भेट देतात. त्यातून तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT