KVK Golden Jubilee Festival : ‘केव्हीके’चा सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात

Pokharni KVK : पोखर्णी (ता. जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रात मंगळवारी (ता. २) कृषी विज्ञान केंद्रांचा सुर्वण जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
KVK Nanded
KVK NandedAgrowon

Nanded News : पोखर्णी (ता. जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रात मंगळवारी (ता. २) कृषी विज्ञान केंद्रांचा सुर्वण जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मशाल प्रज्ज्वलित करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राला हा बहुमान मिळाला.

KVK Nanded
KVK Badnapur : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद, आटारी, पुणेचे संचालक डॉ. सुब्रतो रॉय, संचालक डॉ. एस. डी. मोरे, ‘आत्मा’चे उपसंचालक अनिल शिरफुले, कृषी विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. बी. शेळके (हिंगोली),

डॉ. सचिन दिग्रसे (लातूर), डॉ. प्रशांत भोसले (परभणी) डॉ. वसंत देशमुख (बीड), माधुरी रेवणवार (सगरोळी, नांदेड) यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, बचत गटातील महिला, व्यापारी, उद्योजक, ग्रामीण युवक व युवती, कृषी निविष्ठा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

KVK Nanded
KVK Baramati : कण्हेरीच्या रोपवाटिकेची कृषिमंत्री धनंजय मुंडेंनाही भुरळ

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय कृषी अनुसंधान परिषद गीताने करण्यात आली. त्यानंतर मृदा, बळीराजा, माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी विज्ञान केंद्राची सुवर्ण जयंती उत्सव मशाल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रज्ज्वलित करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील विविध कार्यांचा आढावा संक्षिप्त स्वरूपात सादर केला.

निवडक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रमार्फत गांडूळ युनिट, परसबाग बियाणे आणि कृषी दैनंदिनी वाटप करण्यात आली. प्रा. अल्का पवळे यांनी सुत्रसंचालन तर प्रा. माणिक कल्याणकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com