KVK Durgapur : कृषी तंत्रज्ञान विस्तारात केव्हीके दुर्गापूरचे मोठे योगदान

Agriculture Development : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेसह इतर संस्थांद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यात दुर्गापूर (बडनेरा) केव्हीकेचे मोठे योगदान आहे.
KVK Durgapur
KVK Durgapur Agrowon
Published on
Updated on

Amravati News : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेसह इतर संस्थांद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यात दुर्गापूर (बडनेरा) केव्हीकेचे मोठे योगदान आहे. केव्हीकेच्या संपर्क शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही बाब प्रकर्षाने जाणवली. इतर केव्हीकेंनी देखील हा आदर्श अंगीकारण्याची गरज असल्याचे मत सीआयसीआरचे तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब फंड यांनी व्यक्‍त केले.

दुर्गापूर केव्हीकेच्या विविध उपक्रमांची माहिती घेत शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी केव्हीके दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह, विस्तार विशेषज्ञ प्रताप जायले, गृहविज्ञान शाखेचे विस्तार विशेषज्ञ डॉ. अर्चना काकडे, कृषी विद्या शाखेचे विशेषज्ञ डॉ. हर्षद ठाकूर उपस्थित होते. डॉ. फंड पुढे म्हणाले, की संशोधन विकसित झाल्यानंतर त्याच्या केव्हीके प्रक्षेत्रावर चाचण्या घेण्यात येतात.

KVK Durgapur
KVK Review : ‘केव्हीके’चा ‘आयसीएआर’कडून आढावा

त्याचे परिणाम सकारात्मक आले तरच असे वाण, तंत्रज्ञान शिफारशीत केले जाते. याकरिता बराच कालावधी लागत असल्याने काही महिन्यात किंवा काही वर्षात तंत्रज्ञान, वाण मिळावे ही अपेक्षा चुकीची ठरते. सीआयसीआर तज्ज्ञ डॉ. पूजा वर्मा यांनी या वेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांना पीक व्यवस्थापन विषयक तांत्रिक माहिती दिली. केव्हीके दुर्गापूर महिलांना उद्योमशील बनविण्यासाठी पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी येथील तज्ज्ञांचे विशेष कौतुक केले. केव्हीके प्रमुख डॉ. के.पी. सिंह यांनी केव्हीकेच्या कामाचा लेखाजोखा मांडला.

मेळघाटातील आदिवासीबहूल भागात महिलांना मध गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासोबतच मोरिंगावर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी देखील केव्हीकेकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचे डॉ. सिंह म्हणाले. केव्हीके प्रक्षेत्रावर जैविक पद्धतीने विक्रमी कांदा उत्पादन घेण्यात यश आले आहे. हवामान आधारीत निक्रा प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. त्यासोबतच कापसाशी संबंधित प्रकल्पाच्या अंमलबजावणीतही केव्हीकेने आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

KVK Durgapur
KVK Badnapur : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर

यावेळी खुर्माबाद तसेच उमरी बाजार येथील प्रात्यक्षिक प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. या वेळी राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी नरेंद्र शिंगणे, अरविंद तट्टे, मुकुंद कोलमकर, अर्चना सवाई, पुष्पक खापरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. महेश आखूड, संतोष देशमुख, राहुल घोगरे, आकाश धरमकर, सुरेश वैद्य, आरती येवतीकर, ज्ञानेश्‍वर जिराफे, सचिन पिंजरकर, डॉ. विशाखा पोहरे, डॉ. आनंद वरघट, निशा राठोड उपस्थित होते.

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या सूचनेवरून आढावा

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केव्हीकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यानुसार संशोधनाची दिशा निश्‍चितीचे निर्देश दिले आहेत. त्याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गंत असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी केव्हीके दुर्गापूरला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com