Irrigation Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Irrigation Project : ‘कृष्णा-मराठवाडा’ची डिसेंबरमध्ये चाचणी

Krishna-Marathwada Irrigation : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटणे ते रामदरा या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Solapur News : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटणे ते रामदरा या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २६ ते २७ हेक्टर जमीन संपादन करायची राहिल्याने त्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचे १३ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये योजनेच्या पहिल्या टप्प्याची चाचणी घेतली जाणार आहे.

घाटणे (ता. मोहोळ) ते रामदरा तलाव (तुळजापूर) या अंतरावर पाच टप्पे असून त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सावरगाव टप्प्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित तीन टप्प्यांची कामे देखील ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेली आहेत.

घाटणे बंधाऱ्याजवळील सीना नदीच्या पाणीपातळीपासून २७५ मीटर उंचीवरून ते पाणी रामदरा तलावात आणले जाणार आहे. तत्पूर्वी, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील २६ ते २७ हेक्टर जमीन संपादित करायची असून त्यातील सहा हेक्टर जमिनीच्या संपादनास अडचणी आहेत.

पण, आता सक्तीचे भूसंपादन करण्याचे आदेश असून त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन त्या क्षेत्राचे संपादन केले जाणार आहे. पावसामुळे कामात व्यत्यय येत असून नोव्हेंबरअखेर काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

काम पूर्ण झाल्यावर घाटणे येथून एक टीएमसी पाणी रामदरा तलावात नेले जाणार आहे. त्यानंतर लोहारा व उमरगा या तालुक्यातील साडेसात हजार हेक्टर जमिनीसाठी दीड टीएमसी पाणी लागणार आहे. याशिवाय भूम-वाशी-परंडा तालुक्यासाठी तीन टीएमसी पाणी लागणार आहे.

‘लोहारा-उमरगा’च्या मान्यतेचा प्रस्ताव सादर

बीड जिल्ह्यासाठी उजनी धरणातून १.६८ टीएमसी पाणी नेले जाणार आहे. उजनीच्या काठावरील रामवाडी येथून शिंपुरा- राशीन-कर्जतमार्गे कुंटेफळ धरणात ते पाणी नेले जाणार आहे. या पाण्यातून आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

दुसरीकडे लोहारा व उमरगा तालुक्यातील साडेसात हजार हेक्टर जमिनीसाठी दीड टीएमसी पाणी नेले जाणार असून त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रम दोनअंतर्गत हे काम होणार आहे. त्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी लागणार असून मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मान्यतेनंतर त्याचा सर्व्हे होऊन अंदाजपत्रक तयार होऊन ते शासनाला सादर होईल. अंदाजे ३५० कोटी रुपयांचे हे काम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Mulching: उन्हाळी पिकांसाठी आच्छादन आवश्यक

ASER Report: शिक्षण व्यवस्थेवरील अविश्‍वासाची कथा!

Farmers Issue: कोकणचा ‘आक्रोश’

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

SCROLL FOR NEXT