Krishna River Project : ‘कृष्णे’च्या पुराचे पाणी मराठवाड्यात येणार

Marathwada Drought Solution : दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी शंभर किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा हा प्रस्ताव आहे.
Krishna River
Krishna RiverAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे ४० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी शंभर किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा हा प्रस्ताव आहे.

त्यानंतर हे ४० टीएमसी पाणी बीड, धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये वितरित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊ केले असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना जलसंपत्ती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीतून दरवर्षी वाहून जाणारे अंदाजे ४० टीएमसी पाणी शंभर किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे.

२०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे पुराचे पाणी समुद्रात न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागांच्या सिंचनासाठी करणे आहे.

Krishna River
Drought Free Marathwada : दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी प्रयत्न

या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्थेच्या ‘कृष्णा पूरनियंत्रण प्रकल्पा’अंतर्गत करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारकडून ९६३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, आणि जलवाहिनी प्रणाली सुधारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, पुराचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये वळविण्याची योजना आहे.

Krishna River
Marathwada Drought: मराठवाड्यातील दुष्काळ पाच वर्षांत संपविणार

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाबाबत बैठक पुणे येथील महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळ कार्यालयात नुकतीच (ता. २) झाली. यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी हे अधिकचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार या प्रकल्पाचा ‘प्रकल्प व्यवहार्यता अहवाल तीन महिन्यांत देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. बैठकीला कृष्णा खोरे महामंडळचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, सचिव व्ही. एम. कुलकर्णी, मुख्य अभियंता गुणाले, मुख्य अभियंता धुमाळ, उपसचिव सविता बोधेकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com