Krishna Marathwada Irrigation Project : कृष्णेच्या पाणी वितरणाची कामे हाती घ्या

Irrigation Project Work : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना क्रमांक दोन सहा टप्पे असून यातील टप्पा क्रमांक १ ते ५ घाटणे बॅरेज ते रामदरा तलाव दरम्यानची सध्या प्रगतिपथावर आहेत.
Krishna Marathwada Irrigation Project
Irrigation ProjectAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना क्रमांक दोन सहा टप्पे असून यातील टप्पा क्रमांक १ ते ५ घाटणे बॅरेज ते रामदरा तलाव दरम्यानची सध्या प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा व लोहारा या तीन तालुक्यांना मोठा लाभ होणार आहे. या तालुक्यातील दहा ८६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

टप्पा क्रमांकामधील मधील कामांना प्राधान्यक्रमात मंजुरी देऊन ही कामे तातडीने सुरू करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केल्यानंतर बुधवारी (ता. १२) आयोजित बैठकीत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागणीला हिरवा कंदील दाखवला.

त्यानुसार कामांच्या सर्वेक्षण, संकल्पन व अंदाजपत्रक तयार करावे, असे आदेश त्यांनी दिले. यामुळे रामदरा ते बोरी - एकुरगा या टप्पा क्रमांक सहामधील पाणी वितरणाच्या कामाला आता वेग येणार, असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

जलसंपदा मंत्री तथा कृष्णा खोरे व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याचा नऊ टक्के भूभाग आहे. त्यामुळे खोऱ्यातील पाण्यावर मराठवाड्याचा न्याय्य हक्क आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी २००१ मध्ये मंत्रिमंडळात मंजुरी मिळवून घेतली.

हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी सात टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार सिंदफळ येथील पंपगृहातून तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात लवकरच दाखल होत आहे.

रामदरा येथून हे पाणी बोरी-एकुरगा आणि तेथून बंद पाईपलाईनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतशिवारात जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. पाणी वितरणाच्या सर्वेक्षणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले होते मात्र टप्पा क्रमांक सहामधील प्राधान्यक्रम मंजूर नसल्याने प्रत्यक्षात अंदाजपत्रकाच्या कामांना सुरवात करता येत नव्हती.

Krishna Marathwada Irrigation Project
Irrigation Project Fund : बलून बंधाऱ्यांसह पाडळसे सिंचन प्रकल्प वंचितच; निधीची तरतूद नाही

विखे पाटील यांच्या आदेशानंतर टप्पा क्रमांक सहामध्ये अस्तित्वात असलेल्या आठ साठवण तलाव व नव्याने बांधकाम करण्यात आलेले दोन बंधारे जोड कालव्याद्वारे भरणे प्रस्तावित आहे. यामुळे तुळजापूर तालुक्यातील दोन हजार ८७४ हेक्टर, उमरगा तालुक्यातील दोन हजार ५७ हेक्टर व लोहारा तालुक्यातील दोन हजार १४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

टप्पा क्रमांक सहाध्ये निर्माण होणारे सात हजार ७८ हेक्टर सिंचन क्षेत्र हे उपसा सिंचन योजना क्रमांक दोनच्याएकूण प्रकल्पीय दहा हजार ८६२ हेक्टर सिंचन क्षेत्राच्या ६५ टक्के आहे. या टप्प्यात एक पंपगृह, उर्ध्वगामी नलिका व ८५ किलोमीटर लांबीच्या बंद पाइपलाइन कामाचा समावेश आहे. यामुळे आता कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार असून परिसरातील शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन जीवनमान उंचविण्यास मदत होणार असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला.

Krishna Marathwada Irrigation Project
Dhule Irrigation Projects : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील गाळ ठरतोय डोकेदुखी ; साक्रीतील सर्वच धरणांत सुमारे ५० टक्के गाळ

...असे होणार पाण्याचे वितरण

सिंदफळ येथील पंपगृहातून रामदरा तलावापर्यंतचा पाचवा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. पुढील पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यांतील साधारण साडेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी साधारणपणे ८५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन अंथरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रामदरा येथील पंपगृहातून उपसा सिंचन पद्धतीने पाणी उचलून बोरी-एकुरगा गावापर्यंत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेले जाणार आहे. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाईपलाईनद्वारे हे पाणी वाटेत येणाऱ्या आठ तलाव आणि दोन बॅरेजेस मध्ये भरून घेतले जाणार आहे.

परिणामी खर्चही कमी लागणार आहे. पुढे ते बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देण्याचे प्रस्तावित आहे त्यामुळे सिंचन क्षमतेत ४० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. या दहा साठवण तलावाची क्षमता दोन टीएमसीपेक्षा अधिक असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com