Earthquake  Agrowon
ॲग्रो विशेष

Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसर हादरला!

Earthquake At Koyna : काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. आता साताऱ्यातील कोयना परिसराला भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काही दिवसांपूर्वीच राज्यातील मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते. मात्र लोक भयभीत झाले होते. यानंतर आता साताऱ्यातील कोयना नगर परिसर भूकंपाच्या धक्कांनी हादरला आहे. बुधवारी (ता.१७) दुपारी आलेल्या २.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर झाली.

मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील कोयनानगर व पोफळी परिसराला बुधवारी दुपारी भूकंपाच्या धक्कांनी परिसर हादरला. यामुळे परिसरात भीती पसरली. तर भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नसून भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून १३ किलोमीटर अंतरावर हेळवाक गावाच्या पश्चिमेला आहे. तर भूकंपाची खोली १५ किलोमीटर खोल असल्याची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हादरे

भूकंपाच्या धक्क्यामुळे साताऱ्यातील पाटण तालुका आणि कोयना नगरमध्ये हादरे बसले आहेत. तर २.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातही बसले आहेत. पोफळी परिसर यामुळे हादरला.

धरणाला धोका नाही

कोयना धरण परिसरात बुधवारी आलेल्या भूकंपाचा कोणताही धोका कोयना धरणाला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं धरणाचे कोणतेही नुकसान झालेले नाही असेही धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.

जानेवारीतही भूकंपाचे धक्के

कोयना धरण परिसरात याआधी अनेकदा भूकंपाच्या धक्के बसले आहेत. याच्याआगोदर जानेवारीत देखील येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. २८ जानेवारीला धरण परिसरात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

MSP Reform: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्या: संजय खोडके

Farm Land Dispute: कोलकात्याच्या कंपनीचा शेतजमिनीवर दावा

E Crop Survey: रब्बीतील ‘ई-पीक पाहणी’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT