Marathwada Earthquake : मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत 

Marathwada Vidarbha Earthquake : परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, सेलु आणि गंगाखेड भागात भूकंपाचे धक्के बसले
Earthquake
EarthquakeAgrowon

Pune News : मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्यात बुधवारी (ता.१०) सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिंकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सकाळी ७.१४ वाजेच्या सुमारास भूकंपाने धरणी कंपली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर मराठवाड्यासह विदर्भात झालेला भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतना नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत

परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, सेलु आणि गंगाखेड भागात भूकंपाचे धक्के बसले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिंकामध्ये भीती पसरली होती. तर लोकांनी आपली घरे सोडत मोकळ्या जागेत धाव घेतली. 

विदर्भातील जिल्ह्यांना धक्के

विदर्भातील वाशिमसह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वाशिममधील रिसोड तालुक्यातील काही भाग, पैठण तालुक्यातील पाचोड परिसर हादरले. त्याचबरोबर हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. 

भूकंपचा केंद्रबिंदू 

मराठवाड्यासह विदर्भातील काही भागामध्ये आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याचे समोर आले आहे. तर येथून निघालेल्या भूकंपाचे धक्के नांदेड व परभणी जिल्ह्यात देखील जाणवले. 

दगड काढून घ्यावेत

दरम्यान भूकंपामुळे मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यातील नागरीक भयभीत झाले असून भूकंपाच्या  धक्के सौम्य धक्के असल्याने नुकसान झाले नाही. तर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, ज्यांनी घराच्या पत्र्यांवर दगड ठेवली आहेत ते काढून घ्यावेत असे आवाहन हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com