Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : दिलासादायक! कोयना धरणातून पूर्ण विसर्ग थांबवला, तीन दिवस पावसाची उघडीप

Satara Koyna Dam : आज मंगळवारी सकाळी आठ वाजता पाण्याचा धरणाच्या दरवाजातून करण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Koyna Dam Satara : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, सलग पाऊस पडत नाही. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे.

धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो ४० हजारवर सोमवारी दुपारी करण्यात आला होता. त्यात आणखी कपात करुन तो विसर्ग सोमवारी रात्री आठ वाजता २० हजार क्युसेकवर आणण्यात आला होता.

आज मंगळवारी सकाळी आठ वाजता पाण्याचा धरणाच्या दरवाजातून करण्यात येत असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे धरणातून फक्त पायथा वीज गृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार (Satara Rain) पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच २५ जुलैला धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.

त्यानंतर त्याच रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युसेक सोडण्यात आले. त्यानंतर २६ जुलैला त्या विसर्गात वाढ करुन ३० हजार क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो वाढवून ३० जुलैला ४० हजार तर एक ऑगस्टला पुन्हा ५० हजार विसर्ग सुरु करण्यात आला होता.

त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून पुराचा धोका निर्माण झाला होता. गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो सोमवारी दुपारी ४० हजारवर आणण्यात आला.

त्यानंतर सोमवारी रात्री तो २० हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेला दोन हजार १०० क्युसेक असा २१ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु होता.

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला ५३, नवजाला ९४ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होवू लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT