ॲग्रो विशेष

Kolhapur Waghurde : कोल्हापुरची वाघुर्डे ग्रामपंचायत राज्यात सलग दुसऱ्यांदा बेस्ट फाईव्ह, असा मिळवला सन्मान

Panhala Tehsil Vaghurde : वाघुर्डे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी, घरफाळा, दिवाबत्ती अशा विविध करांची १०० टक्के कर वसुली केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Gram panchayat : मागील आर्थिक वर्षात १०० टक्के करवसुली करून कोल्हपूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या मौजे वाघुर्डे ग्रामपंचायतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा 'बेस्ट फाईव्ह'मध्ये येण्याचा मान पटकावला आहे. ग्रामपंचायतीने विविध बाबींसाठी ३१ मार्चपूर्वीच अंमलबजावणी केली.

ई ग्राम स्वराज शासनमधील या यशाचे श्रेय ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी रामहरी वरकले यांना आहे.

या ग्रामपंचायतीने पाणीपट्टी, घरफाळा, दिवाबत्ती अशा विविध करांची १०० टक्के कर वसुली केली. त्यातून पाच टक्के दिव्यांग निधी, दहा टक्के महिला व बालकल्याण निधी, १५ टक्के मागास निधी, १५ वा वित्त आयोग १०० टक्के खर्च आदी रकमांचा ३१ मार्चपूर्वी १०० टक्के विनियोग केला. त्यानुसार आदर्श ग्रामपंचायत म्हणून वाघुर्डे ग्रामपंचायतीने नावलौकिक मिळवला.

जिल्हा परिषद प्रशासनासह गटविकास अधिकारी सोनाली माडकर, विस्तार अधिकारी वासुदेव कांबळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे. वरकले यांच्यासह सरपंच अमोल नवलव, उपसरपंच सुभाष पाटील, सदस्य सर्जेराव सुतार, एकनाथ नवलव, संदीप कांबळे, चंदाबाई शिखरे, सविता केसरकर, छाया गुरव, सीमा रावण, सावित्री पाटील, संगणक ऑपरेटर खंडेराव पाटील, शिपाई तानाजी गुरव, शरद नवलव, पंडित कांबळे आदींनी यात योगदान दिले.

सलग १३ वर्षे १०० टक्के वसुली

वरकले यांनी १३ वर्षांच्या सेवेत पाटपन्हाळा येथे सलग सहा वर्षे, पोर्ले तर्फ बोरगाव येथे सलग पाच वर्षे तर वाघुर्डे येथे सलग दोन वर्षे अशी एकूण १३ वर्षे सलग १०० टक्के करवसुली करून एक आदर्श निर्माण केला आहे.

वरकले यांचे नियोजन व त्यांना पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांनी केलेले सहकार्य यामुळेच यश मिळाले त्याने गावच्या लौकिकात भर पडली आहे. अमोल नवलव, सरपंच

दरवर्षी मेमधील ग्रामसभेला कर का भरावेत, याविषयी मार्गदर्शन केले जाते. लोकांमध्ये, ही माझी ग्रामपंचायत आहे, अशी भावना जागृत करून लेखा-जोखा सभेत मांडतो. महाराष्ट्र अधिनियम १९५८ कलम २९ (क) प्रमाणे नोटीस मिळताच लोक कर भारतात. त्यामुळे नियोजित सर्व हेड वेळेत खर्ची पडतात. परिणामी, १०० टक्के कर वसुलीचे श्रेय समस्त ग्रामस्थांचे आहे. - रामहरी वरकले, ग्रामविकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT