Millet  Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Festival : कोल्हापुरात भरणार मिलेट, फळ महोत्सवाची मेजवानी

Fruit Festival : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने १ ते ५ मार्च या कालावधीत ‘मिलेट व फळ महोत्सव’ होणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने १ ते ५ मार्च या कालावधीत ‘मिलेट व फळ महोत्सव’ होणार आहे. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे हा महोत्सव होईल.

शनिवारी (ता. १) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक महेश कदम, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे आदींची या वेळी उपस्थिती असेल.

महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियेमध्ये काम करणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या व सांगली जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवात ४० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविन्यपूर्ण उत्पादने व द्राक्षे थेट उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

या मिलेट महोत्सवामध्ये मिलेट उत्पादन, मुल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व या विषयी नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, महिलांसाठी मिलेट आधारित पाककृती स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असे कार्यक्रम असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

Cotton Production Research: यांत्रिकीकरण, स्वच्छ कापूस उत्पादनावर संशोधन

User Charges: ‘यूझर चार्जेस’ला व्यापाऱ्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT