Kolhapur Weather Update  agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Weather Update : कोल्हापूरचा पारा घसरला, आणखी किती दिवस राहणार थंडी

Kolhapur Weather : कोल्हापुरात पहाटेचे तापमान १३ अंश सेल्सिअस आणि दुपारच्या तापमानाची नोंद २७ ते ३० डिग्री अंश सेल्सिअस होत आहे.

sandeep Shirguppe

Weather Update Kolhapur : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. संक्रांतीनंतर उत्तरायणामध्ये थंडी कमी होते असे बोलले जाते परंतु यंदा थंडी वाढतच असल्याचे चित्र आहे. पुढील आठवडाभर तापमान घसरलेलेच राहणार असल्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.

कोल्हापुरात पहाटेचे तापमान १३ अंश सेल्सिअस आणि दुपारच्या तापमानाची नोंद २७ ते ३० डिग्री अंश सेल्सिअस होत आहे. शहरासह ग्रामीण भागात पारा सरासरीपेक्षा खाली घसरल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे.

दरम्यान पडलेल्या थंडीने रबी पिकांना चांगला फायदा होत आहे. गहू, ज्वारीसह अन्य पिकांना या थंडीमुळे पीक वाढीसाठी उपयोग होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्च दाबाच्या भिंतीचा अडथळा दूर झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. सध्याच्या 'एल-निनो'च्या प्रभावामुळे, एकापाठोपाठ पास होणारे तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीमुळे उत्तर भारतात धुके आणि बर्फवृष्टीसोबत पाऊस पडत आहे.

यावर हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे म्हणाले की, या आठवड्यात थंडीचे प्रमाण अधिक जाणवणार असून, एखाद्या डिग्रीने तापमानात वाढ जाणवेल. या काळात पावसाचीही शक्यता असल्याचे ते म्हणाले.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारताच्या काही भागांमध्ये, मध्य भारताच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे.

पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT