Sugarcane Farmer agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळी मुकादमांवर कोल्हापूर पोलीस अधिक्षकांची थेट कारवाई, १२६९ जण संशयित

Kolhapur Sugarcane farmer : कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Farmer News : मागच्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी ठेकेदारांकडून ऊस वाहतूक करणाऱ्याच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये बारा जिल्ह्यातील १ हजार २६९ ठेकेदार संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कारवाईची धडक मोहिम राबवली आहे.

याबाबत दैनिक सकाळने दिलेल्या बातमीनुसार, कोल्हापूर जिल्हा दलाने स्वतंत्र पथक नेमून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. तपासातील ३८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. याचबरोबर आणखी काहींनी लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची सांगण्यात आले. या प्रकरणात २०१६ पासून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून फिर्यादी घेऊन मोहीम राबविली गेली. यंदाच्या गळीत हंगामात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस दक्ष आहेत.

प्रामुख्याने ऊस तोडणीसाठी टोळी आणतो, त्या पोटी आगाऊ रक्कम उचलणे, टोळी न दिल्याने पैस परत मागण्यासाठी गेलेल्या शेतकन्यांना दमदाटी असे या फसवणूक प्रकरणातील गुन्हे आहेत. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत असे गुन्हे नोंद आहेत. वारंवार असे प्रकार घडू लागल्यामुळे पोलिसांनी फिर्याद घेण्याची मोहीमच गेले काही महिने उघडली होती.

त्यातून २०१६ पासून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी फिर्यादी नोंदविल्या. त्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पथकाने संबंधित संशयितांना आणण्याचे काम आता वेगाने सुरू केले आहे.

सांगलीतून संदर्भ घेऊन सोलापुरातूनही काही संशयितांना अटक केली आहे. एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी फिर्याद नोंदविणे आणि स्वतंत्र पथक नेमून तपास करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे.

कोल्हापूरसह सांगली सातारा भागात ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. येथील ऊस तोडणीसाठी खानदेश, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्रातील ऊस तोड मजुरांना, टोळ्यांना पायघड्या घातल्या जात होत्या; मात्र त्यामध्ये काही बनावट ठेकेदार तयार झाले आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक झाली आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस तोडणी ठेकेदार वा टोळ्यांकडून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथकांकडून १२ हून अधिक जिल्ह्यांत तपास सुरू केला आहे. पोलीस रेकॉर्डवर आलेली फसवणूक ९२ कोटींहून अधिक आहे. फसवणुकीचे हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

फसवणूक करणारे ठेकेदार विविध जिल्ह्यातील

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणारे ठेकेदार प्रामुख्याने बीड, बुलढाणा, धाराशीव, लातूर, जालना, परभणी, धुळे, यवतमाळ, धुळे, हिंगोली, सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी ३८ ठेकेदारांना अटक केली आहे. उर्वरित ठेकेदारांसह इतरांनाही शोधून अटक करण्याची कारवाई सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT