Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'कडून महाडिकांच्या कारखान्यांची साखर अडवत लोकांना वाटली, पोलिसांची मध्यस्थी

Swabhimani Shetkari Sanghatana : आंदोलनस्थळी हेरवाडसह परिसरातील शेकडो स्वाभिमानी कार्यकर्ते जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Sugarcane FRP protest
Sugarcane FRP protestagrowon
Published on
Updated on

Sugarcane FRP Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उसाला दुसरा हफ्ता ४०० रुपये द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरा हफ्ता न दिल्यास २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची साखर अडवण्याचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातील साखर वाहतूक करत असलेले २३ कंटेनर काल(ता.१९) रात्री साडेसातच्या सुमारास हेरवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अडवून धरली. कंटेनरच्या चाकातील हवा सोडत चाव्या काढून घेत. तसेच काही पोती खाली टाकून साखर वाटण्यात आली.

आंदोलनस्थळी हेरवाडसह परिसरातील शेकडो स्वाभिमानी कार्यकर्ते जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले मात्र कारखान्याचे कार्यकारी संचालक, जबाबदार अधिकारी आणि खरेदी करणारे व्यापारी आल्याशिवाय कंटेनर सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

Sugarcane FRP protest
Raju Shetti VS Hasan Mushrif : '४०० चे गणित सांगण्यास कागलमध्ये आलोय', पालकमंत्री हसन मुश्रीफांना राजू शेट्टींचे आव्हान

दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास व्यंकटेश्वरा कारखान्याचे विभागीय शेती अधिकारी महेश भोसले आंदोलनस्थळी आले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री पोलीस बंदोबस्तात साखर कारखान्याकडे पाठविल्यानंतर तणाव निवळला.

आंदोलनात सागर शंभूशेटे, अकिवाटचे माजी सरपंच विशाल चौगुले, सुवर्णा अपराज, विश्वास बालीघाटे, बाळासो माळी, योगेश जिवाजे, अविनाश गुदले, संदीप राजोबा, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com