Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजसमध्ये रूपांतर करावे : अजित पवार

Kolhapur Style Bunds : ‘‘सिंचनासाठी आवश्यक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीने करावी,’

Team Agrowon

Mumbai News : ‘‘सिंचनासाठी आवश्यक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीने करावी,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. ७) दिले.

जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड या जिल्ह्यांतील विविध प्रलंबित योजनांसंदर्भातील वित्तीय व अन्य प्रश्‍नांसंदर्भात श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे.

काही मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी किटवडे प्रकल्प आंतरराज्य प्रकल्प म्हणून पूर्णत्वास यावा.

यामध्ये साठवण क्षमता वाढविल्यास त्याचा कर्नाटकसह गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागाला फायदा होऊ शकतो. त्यातून या भागातील नागरिकांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळेल. याबाबत जलसंपदा विभागाने कर्नाटक शासनाशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करावी.’’

बैठकीला आमदार बबनराव शिंदे, राजेश पाटील, संजय शिंदे, बाळासाहेब आजबे, यशवंत माने, चंद्रकांत नवघरे, माजी आमदार अमरसिंह पंडित, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. दीपक कपूर अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT