Sangli Kolhapur Flood : महापूर काळात सांगली जलसंपदा विभाग निवांत; कर्नाटकच्या अधिकाऱ्यांशी संपर्कच नाही, अहवालातून स्पष्ट

Almatti Dam : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे आलेल्या महापुराचा २०१९ आणि २०२१ साली मोठा फटका बसला.
Sangli Kolhapur Flood
Sangli Kolhapur Floodagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे आलेल्या महापुराचा २०१९ आणि २०२१ साली मोठा फटका बसला. दरम्यान हा महापूर टाळण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीच्या वतीने आलमट्टी हिप्परगी अभ्यास दौऱ्याचा अहवाल जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

या अहवालात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जलसंपदाचे अधिकारी, तसेच जलतज्ज्ञांची संयुक्त पूर संनियंत्रण समिती स्थापन करावी, अशी प्रमुख मागणी केली. समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सदस्य विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रमोद माने आदी यावेळी उपस्थित होते.

या अहवालात नुकत्याच झालेल्या आलमट्टी हिप्परगी येथील दौऱ्यातील निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. यात दोन्हीकडील अधिकारी पावसाळ्यात धरण साठ्याबाबतच्या केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचे पालन करीत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिप्परगी बंधाऱ्याच्या व्यवस्थापनाशी सांगली विभागातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा संपर्क असत नाही असे दिसून आले. हे तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या बंधाऱ्याचे मुख्य अभियंता श्री. राठोड बेळगाव येथील कार्यालयात असतात. त्यांच्या आदेशानेच या बंधाऱ्यातील पाणीपातळी निश्‍चित केली जाते. सांगलीतील जलसंपदा विभागाने त्यांच्याशी समन्वय ठेवला पाहिजे. पावसाळ्यात दोन्ही राज्यांतील धरणांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची गरज तेथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी सांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांची पूर सनियंत्रण समिती स्थापन करावी. या समितीत संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, जलविज्ञान, सीडब्ल्यूसीचे तज्ज्ञ असावेत. या समितीच्या माध्यमातून धरणांचे एकात्मीक परिचलन व्हावे.

Sangli Kolhapur Flood
Kolhapur Sangli Flood : 'महापूर टाळण्यासाठी नियंत्रण समितीच नाही ही बाब खेदजनक' पूर परिषदेत नाराजी

सध्या राधानगरी ते कोयना हा संपूर्ण पट्ट्यात एक सारखा पाऊस पडत आहे. हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे कर्नाटक शासन ऑगस्टअखेर वरच ठेवते. वस्तुतः या बंधाऱ्याला कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्व नियम लागू आहेत. त्यासाठी कर्नाटक सरकारला स्पष्ट सूचना देऊन अतिवृष्टीच्या काळात बंधाऱ्याचे दरवाजे शंभर टक्के उघडले पाहिजेत. समितीने या अहवालात कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे हटवणे तसेच नाशिक जलविज्ञान (हायड्रॉलॉजी) विभागाच्या मंजुरीविना झालेल्या नव्या पुलांकडे लक्ष वेधले आहे.

केंद्रीय जलआयोगाच्या जानेवारी २०१८ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच दोन राज्यांच्या समन्वय समितीच्या धोरणानुसार आलमट्टी धरणातील पातळी प्रामुख्याने ३१ जुलैला पन्नास टक्के, ३१ ऑगस्टला ७७ साठा ठेवावी. त्यावेळी पाणीपातळी ५१७ मीटर ठेवली पाहिजे. दैनंदिन पाणीपातळी व आवक जावक विसर्ग प्रत्येक तासाला कळवावी. हिप्परगी बॅरेज येथे दोन्ही राज्यांचे अभियंते दैनंदिन पाणीपातळी विसर्गबद्दल माहिती सांगतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com