Kolhapur Sangli Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर- सांगली महापुराचे थेट पाणी मराठवाड्याला मिळणार असा असेल प्लॅन

World Bank Scheme : जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यामुळे या योजनेला गती मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

sandeep Shirguppe

Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर- सांगली महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना बनवली आहे. यामुळे मराठावाड्‌यालाही पाणी मिळणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यामुळे या योजनेला गती मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येणार आहेत त्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. १४) जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यातील निरीक्षणे त्यांनी आज (ता. १५) मुंबईत झालेल्या बैठकीत मांडली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'जोखीम गृहीत घरून जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार आहे, याशिवाय, नाचार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३७ सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी ४ हजार ६४३ कोटी रुपये खर्च येणार असून, सिंचनक्षमता वृद्धीसाठी १५५ प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

यासाठी ५ हजार ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. पहिल्या टप्प्यात ही सुमारे १० हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्यात आणखी ३८ अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेली जाणार आहेत, अशी एकूण १५ हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत.

बैठकीस खासदार संजय पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसेच राज्याच्या विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT