Kolhapur and Sangli Flood : महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या १८ सूचना, पुराचे पाणी दुष्काळी भागात जाणार?

Kolhapur Flood : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) राबवण्यात येणार आहे.
Kolhapur and Sangli Flood
Kolhapur and Sangli Floodagrowon

Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) राबवण्यात येणार आहे. या संदर्भात आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक झाली. यामध्ये जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी १८ मार्गदर्शक सूचना केल्या.

महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी या उपाययोजना प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. बैठकीची माहिती देताना ते म्हणाले, "महापुराच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली. जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती नियंत्रण उपाययोजनांसाठीचा हा प्रकल्प राबवताना नागरिकांपर्यंत तत्काळ माहिती देण्यासाठीची प्रभावी यंत्रणा तयार करणे, सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण कक्ष सक्षम करणे यासंबंधीही बैठकीत चर्चा झाली.

यानंतर याबाबत मुंबईत बैठक होणार आहे." यावेळी बँकेच्या पथकातील जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपस्थित होते.

जागतिक बँकेच्या पथकाने

शहरातील व्हिनस कॉर्नर, सुतारवाडा, आंबेवाडी, प्रयाग चिखली, राजाराम बंधारा व पंचगंगा नदीवरील शिरोली येथील पूरबाधित क्षेत्रांसह जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूस्खलन परिस्थितीची व दुधाळी येथील महापालिकेच्या एसटीपी प्लॅन्टची पाहणी केली. पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीच्या वाढत जाणाऱ्या पाणीपातळीच्या नोंदी १९८८ पासून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळीवरून घेतल्या जातात.

यावरून पूर परिस्थितीचा अंदाज घेतला जातो, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता म्हेत्रे यांनी यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या पहिल्या टप्प्यासाठी ३२०० कोटींच्या निधीला जागतिक बँकेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

Kolhapur and Sangli Flood
Kolhapur Sugarcane : साखर कारखाने म्हणतात १०० रुपये द्यायला परवडत नाही, जिल्हाधिकारी भूमिका घेणार का?

नदी पात्रातील भराव, अतिक्रमणे यामुळे वारंवार महापुराची स्थिती उद्भवते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांनी महापूर नियंत्रणासाठी ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या, त्याला या प्रकल्पामुळे मूर्तस्वरूप येणार आहे. त्यामुळे प्रकल्प पथदर्शी ठरेल.

- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

पंचगंगेच्या महापुराचे ८८ पाणी कृष्णेला काटकोनात मिळते. पंचगंगेचे पाणी कृष्णेत प्रवाहित न होता पंचगंगेच्या पाण्याचा फुगवटा शिरोळपासून कोल्हापूरच्या दिशेने निर्माण होतो. यासाठी उपाय करताना जागतिक बँकेच्या अनुप कारनाथ यांनी कृष्णा व पंचगंगा नदीच्या गणितीय अभ्यास करण्याच्या सूचना केल्या आहेत. - धैर्यशील माने, खासदार

पथकाच्या काही प्रमुख सूचना

राधानगरी धरणाचा दरवाजा बदलणे

राजाराम, सुर्वे बंधारा नवीन डिझाईनप्रमाणे बांधणे

नदी पात्रातील अतिक्रमणे काढणे

पात्रातील गाळ कढणे, तीव्र वळणे कमी करणे

महापूर काळातील नियंत्रण कक्ष सक्षम करणे

महापुराचा अलार्म देण्याची स्वयंचलित यंत्रणा बसवणे

महामार्ग, पूल, बंधारे यांच्या डिझाईनमध्ये आवश्यकतेनुसार बदल

भूस्खलन होणाऱ्या जागा निश्चित करून तेथील स्थलांतर

वीज पुरवठा खंडित होऊ न देणे

गावांशी दळणवळणाचा संपर्क तुटू न देणे

ऐतिहासिक वारसा स्थळांचे महापुरापासून संरक्षण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com