Kolhapur Vegetables Market agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो, गवार, रताळ, बटाटा भाव वाढले, कोथिंबीर मात्र कवडीमोल भावात

sandeep Shirguppe

Kolhapur Tomato Potato Rate : कोल्हापूरच्या आठवडा बाजारात अचानक भाजीपाला, फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर वाढले आहेत. नवरात्रीमुळे फळबाजारांत चांगली मागणी असूनही दरात तेजी आहे. विशेषतः टोमॅटोचा किलोचा दर साठ, तर वांगी, दोडका पन्नास रुपयांनी विकला जात आहे. गवारीचे दर शंभर ते सव्वाशे असा किलोचा दर झाला आहे. नवरात्रोत्सव उपवासात रताळे, बटाट्यांची आवक वाढली आहे. दरही वाढले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी मेथी, शेपू, कोथिंबीरचे दर वाढले होते. आता हेच दर अगदी दहा रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मध्यंतरी टोमॅटोचा दर दहा ते वीस रुपये किलोपर्यंत होता. तो अचानक साठ रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा थेट परिणाम आवक कमी आणि दरवाढ झाली.

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयात)

वांगी ४०ते ६०, दोडका ४०, कोबी १० ते २० रुपये नग, घेवडा ४० ते ६०, कारली ४०, भेंडी ३० ते ४०, काकडी ३० ते ४०, ढब्बू मिरची ६० ते ८०, गाजर ४०, आले ७०, फ्लॉवर २० ते ३०, मका कणीस (स्वीट कॉर्न) १० रुपये नग, साधे कणीस ५ ते ७, बीट १० रुपये नग, शेवगा शेंग १० रुपयास दोन, मुळा १०, कांदा ५०, बटाटा ४० ते ५०,

पालेभाज्यांचे दर

मेथी १० रुपये पेंडी, कोथिंबीर ५ ते १०, शेपू १०, पालक ७ ते १०, पोकळा १० ते १५, अंबाडा ५ ते १०, करडा ५ ते १०, अळू ५ रुपये पेंडी, चाकवत १० ते १५, कांदापात ७ ते १०, मिश्र भाजी १० रुपये वाटा,

तेलाचे दरही वाढले

शेंगतेल २०० ते २१० रुपये (किलो), सूर्यफूल १४० ते १५०, खोबरेल २७० ते ३००, सरकी १४० ते १५५,

फळांच्या दरातही चढउतार

सफरचंद १०० ते ३०० रुपये किलो, मोसंबी ६० ते १०० रुपये, डाळिंब २०० ते ३०० रुपये, केळी २० ते ६० डझन, जवारी केळी ४० ते ८० रु, डझन, टरबूज १० ते २० रुपये नग, ड्रॅगन फ्रुट १२० ते २०० रुपये, पेरू १२० ते १५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

Land Dispute : अति उत्साहीपणा आला अंगलट

Crop Loan : रब्बी हंगामात तेराशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : वंचित शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्या

Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

SCROLL FOR NEXT