Kolhapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur APMC : शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोल्हापूर बाजार समिती परवाने देणार

Farmers Producer Company : केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा शेतीमाल संकलित करून बाजारपेठेत नेणे व त्याचे विक्री करून शेतकऱ्यास योग्य मोबदला मिळावा या हेतूने शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती केलेली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा शेतीमाल संकलित करून बाजारपेठेत नेणे व त्याचे विक्री करून शेतकऱ्यास योग्य मोबदला मिळावा या हेतूने शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती केलेली आहे.

अशा कंपन्यांना बाजार समितीतर्फे शेतीमाल खरेदी-विक्रीचे परवाना देण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ॲड. प्रकाश देसाई यांनी दिली. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या सभासदांकडून संकलित केलेला शेतीमाल बाजारपेठेत विकण्यासाठी बाजार समितीकडून सहकार्य मागितले होते.

या संदर्भात बाजार समितीत बैठक झाली. त्‍यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी शेतीमाल खरेदीसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत सुविधा देण्याची मागणी केली. त्याला बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी मान्याता देत परवाने देण्यात येतील, असेही जाहीर केले.

या वेळी राज्य कृषी पणन विभागाचे प्रतीक गोनुगडे म्हणाले, की शेतकरी उत्पादक कंपन्या केंद्र सरकारच्या ई-नाम योजनेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून अनुदान व अन्य सुविधा देण्यासाठी पणन मंडळाकडून पाठपुरावा सुरू आहे.

त्याचाही लाभ शेतकरी सभासदांना होणार आहे. त्यामुळे शेतकरी कंपन्यांनी बाजार समितीकडून परवाने घ्यावेत. या वेळी पणन मंडळाचे सत्यजित भोसले, ई-नामचे रोहित पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT