Sugarcane Owners Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugarcane Owners : साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील; धान्य उदंड पिकलं, वाघापुरात कृष्णात डोणे यांची भाकणूक

Kolhapur Bhaknuk : कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य रात्री भाकणूक पार पडली.

sandeep Shirguppe

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य रात्री भाकणूक पार पडली.

यावेळी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांनी भाकणूक केली. त्यांच्या भाकणुकीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक, भाकणूक झाली. यावेळी वाघापूरकर महाराज यांनी साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील असे भाकीत केले आहे तर भगवा झेंडा राज्य करेल असेही ते म्हणाले आहेत.

वाघापूरकर महाराज यांनी, साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघाल, समाज समाजात भांडणं लावतील, देशात मोठा कायदा येईल, शेतीचे भाव वाढत जातील, कुणब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाय, मेघराजाची वाट बघत राहशीला, दुष्काळ पडलं अशी भाकणूक कृष्णात डोणे यांनी वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य केली.

केलेल्या भाकणूकीतील महत्वाचे मुद्दे : साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा बाळानों राज्य गा करील, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघलं, समाज समाजात भांडणं लावतील, देशात गा मोठा कायदा येईल, शेतीचे भाव वाढत जातील, कुणब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाय, मेघराजाची वाट बघत राहशीला, पडंल पडंल बाळांनो दुष्काळ पडलं.

पाऊसपाणी पीक यांचं कालमान बदलत चाललंय, दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकलं, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल.

येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल,नदीकाठावरील जमीन ओसाड पडंल, गर्वानं वागू नका, गर्वाचं घर खालीच होईल, होईल होईल भूकंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल, ज्योतिर्लिंगाची करशीला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन.

यावेळी भाकणुकीस ज्योतिर्लिंग देवालयाचे पुजारी दत्ता गुरव, जोतिर्लिंग देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष, सरपंच बापूसाहेब आरडे, समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सर्व नवरात्रकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT