Agriculture Department Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Kolhapur : सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचे २२ कोटींचे व्याज

Crop Loan Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे व्याज मिळणार आहे. राज्य शासनाकडून पीक कर्जापोटी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ९ कोटी ९९ लाख निधीला आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Crop Loan Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे व्याज मिळणार आहे. राज्य शासनाकडून पीक कर्जापोटी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ९ कोटी ९९ लाख निधीला आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. तर जिल्हा नियोजन मधून ७१ हजार ५०४ शेतकऱ्यांना ११ कोटी ९९ लाख अनुदानाला मंजुरी मिळाली होती. एकूण १ लाख २४ हजार १५१ शेतकऱ्यांना २१ कोटी ९९ लाख रुपये व्याज आचारसंहितेनंतर नंतर मिळणार आहे.

या व्याजाचा फायदा शेतकऱ्यांना रब्बी, उन्हाळी हंगामासाठी उपयोग होणार आहे. बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक विभागाकडून मिळाली आहे.

याबाबत सहकार विभागाचे उपनिबंधक निलकंठ करे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. अनुदान शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. आचारसंहितेमुळे या अनुदानाचे वाटप थांबले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती करे यांनी दिली.

शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी २००६-०७ पासून केंद्र व राज्य शासनाने बँकांना व्याज सवलत योजना दिली आहे. पीक कर्जाची निर्धारित मुदतीत म्हणजेच ३६५ दिवसात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत केली जाते. यामध्ये केंद्रशासनाकडून ३ टक्के दिले जाते. तसेच राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज योजनेअंतर्गत ३ टक्के दिले जाते. असे ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यात येते.

अतिवृष्टी, महापूरामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे व्याज उपयोगी ठरणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे व्याज मिळणार आहे. राज्य शासनाकडून पीक कर्जापोटी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा, २०२१/२२ साठी ९ कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले होते. जिल्हा नियोजनमधून ७१ हजार ५०४ शेतकऱ्यांना ११ कोटी ९९ लाख अनुदानाला मंजुरी मिळाली होती. एकूण एक लाख २४ हजार १५१ शेतकऱ्यांना २१ कोटी ९९ लाख रुपये व्याज, निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर नंतर मिळणार आहे. बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

तालुकानिहाय २०२१/२२ मधील लाभार्थी

आजरा तालुक्यात ३ हजार ७९९ शेतकऱ्यांना ७२ लाख ३९ हजार रुपये मिळणार आहेत. तर गगनबावडा तालुक्यात ५ हजार ४७६ शेतकऱ्यांना १ कोटी ७२ लाख रुपये मिळणार आहेत. शाहूवाडी तालुक्यात ३ हजार २२३ शेतकऱ्यांना ६० लाख ५५ हजार रुपये, करवीर तालुक्यात १९२ शेतकऱ्यांना ३ लाख ६३ हजार रूपये मिळणार आहेत. चंदगड - १८ हजार २२४ शेतकऱ्यांना ३ कोटी ७३ लाख, तर करवीर तालुक्यातील (सन २०२२/२३) मधील शेतकऱ्यांना २१ हजार ६४४ शेतकऱ्यांना ३ कोटी १४ लाख रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT