sandeep Shirguppe
कोल्हापूरच्या गडमुडशिंगी येथील तरुणाने नोकरीच्या मागे न लागता २० गुंठ्यात केळी बाग करून दहा महिन्यांत पावणेतीन लाखांचे उत्पन्न मिळविले.
हर्षद गडकरी या युवकाने शेतीत लक्ष घालून नोकरीपेक्षा आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो असा नवा आदर्श दिला आहे.
हर्षद गडकरी इतिहास विषयातील पदवीधर आहे. नोकरीच्या मागे न लागता त्याने वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे करण्याचा निर्धार केला.
आपल्या २० गुंठे शेतीमधून दहा महिन्यांत १५ टन केळीचे उत्पादन घेत त्यामध्येच झेंडूचे आंतरपीक घेऊन उत्पन्नात वाढ करून दाखवली आहे.
केळी बाग व झेंडूच्या आंतरपिकासाठीचा संपूर्ण उत्पादन खर्च ६० हजार रुपये झाला.
शेतीतून केळीचे दोन लाख ८० हजार रुपये, तर झेंडूच्या फुलांचे ६० हजार रुपये उत्पन्न मिळवले.
सर्व खर्च वजा जाता निव्वळ २ लाख ८० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविले.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केळीची लागण केली. त्यामध्येच झेंडूची लागणही करून डबल उत्पादन केल्याचे हर्षद गडकरी यांनी सांगितलं.