Kolhapur Animal Diseases agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Animal Diseases : कोल्हापूर जिल्ह्यात लाळखुरकतचा प्रादुर्भाव, ९ जनावरे दगावली

Kolhapur Animal Department : लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात लाळखुरकतचा धोका वाढला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Animal Department : मागच्या काही महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी या संसर्गरोगाने शेकडो गायींचा मृत्यू झाला होता. दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात लाळखुरकतचा धोका वाढला आहे. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली या गावातच ९ जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान याबाबत जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाळ्याच्या शेवटी आणि थंडीच्या सुरूवातील गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या तसेच बैलांना या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. जिल्ह्यात पंधरा ते वीस दिवसापासून अनेक गावांत लाळखुरकतची लक्षणे दिसत आहेत. दरम्यान या रोगाचा फैलाव जोरदार होत असल्याने ठिकपूर्ली या एका गावात ९ जनावरे दगावली आहेत. पशुपालकांनी गावपातळीवर काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकांना याची माहिती दिली.

याबाबत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडेही तक्रार केली. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित औषधपुरवठा होत नाही. वेळेत औषध मिळत नसल्याने आणि शेतकऱ्यांना बाहेरील महागडी औषध खरेदी करावी लागत आहेत. वेळेत उपचार होत नसल्याने जनावरांमध्ये लाळखुरकतचा धोका वाढत असल्याची तक्रार पशुपालक करत आहेत.

टिकपुर्ली एका गावात ३५० हून अधिक जनावरांना लाळखुरकतची कमी-अधिक प्रमाणात लागण झाली. जनावरांकडून चारा खाल्ला जात नाही. तोंडातून लाळ गळत आहे. ही सर्व लक्षणे संबंधित विभागाला सांगूनही ठोस उपाय होत नाही. त्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकांमधून संताप व्यक्त होत आहे.

यामध्ये अजय चौगले दूध उत्पादकाची १ म्हैस आणि १ गाय, राजाराम चौगले यांच्या २ गायी तर वसंत पाटील, बापूसो चौगले, बाजीराव पाटील, पांडुरंग मळगे आणि पांडुरंग एकल यांची प्रत्येकी १ गाय आणि धनाजी एकल यांची १ म्हैस दगावली आहे.

लाळखुरकत आजारासाठी जनावरांना दिली जाणारी औषधे महाग आहेत. एका-एका जनावरासाठी सहा ते सात हजारांची औषधे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून औषध पुरवठ्याची वाट पाहिली जात आहे. पण, पशुसंवर्धन विभागाला याचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जनावरे दगावण्याची संख्या वाढत चालली आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर म्हणाले की, लाळखुरकत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. ठिकपुर्ली येथे आज सकाळी एक पथक तपासणी करुन आले आहे. एका जनावराचे शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल येईल. औषधही दिली जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT