Kolhapur Jilha Bank agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Jilha Bank : २० गुंठे जमिनीवर मिळणार ५ लाख रुपये कर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेची मोठी संधी

KDCC Bank Scheme : कोल्हापूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या हाताला उद्योग वाढीसाठी एक उपक्रम हाती घेतला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Jilha Bank Scheme : कोल्हापूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या हाताला उद्योग वाढीसाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांना रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेतजमीन तारणावर कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.

पाच लाखांच्या कर्जासाठी २० गुंठे जमीन तारण देता येणार आहे. यासाठी कर्जदाराची आणि सहकर्जदारांची बिगर शेती जमीन तारणाची अट शिथिल केली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण भागात अद्यापही सिटी सर्वे झालेला नसल्यामुळे बिगरशेती तारण देताना कर्जदाराला अडचणी येत आहेत. ती अट रद्द करून ही नवी सुधारणा केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी पूरक व्यवसाय कृषी आधारित उद्योग, वाहतूक सेवा उद्योग यामधील रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या नवीन संधींचा विचार केला आहे. जिल्हा बँकेने ही योजना प्रभावीपणे राबविली आहे.

हे आहेत योजनेचे निकष : कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असायला हवा, अर्जदाराचे वय कमाल ४५ वर्षे असावे, वीस लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी सातवी तर २५ लाखांपर्यंतसाठी दहावी पास बंधनकारक, कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ, उत्पादन व सेवा याअंतर्गत येणारे प्रकल्प पात्र राहतील.

सात वर्षे परफेड, १२ टक्के व्याज, मध्यम मुदत कर्ज परतफेडीचा कालावधी ५ कालावधी ५ ते ७ वर्षे अहे. त्यासाठी दर साल दर शेकडा १२ टक्क्यांप्रमाणे व्याजाची आकारणी केली जाणार आहे.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. त्यातील ही महत्त्वपूर्ण असून, त्याचा लाभ सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा, -जी. एम. शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT