Kolhapur DCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

Kolhapur DCC Bank : शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी बँकेने निव्वळ नफ्यातून तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराने ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्न करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : एकही रुपया खर्च न करता शेतकऱ्याला तंत्रज्ञान वापरासाठी अनुदान देण्यात येणार आहे. हा निर्णय घेणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) राज्यातील पहिली ठरली आहे. शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी बँकेने निव्वळ नफ्यातून तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराने ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्न करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे.

अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष माजी आमदार राजू आवळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे की, ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित साखर कारखान्याच्या सहमतीने तत्काळ बँकेकडे अर्ज करावेत. हे अर्ज करण्यासाठी येत्या महिनाभराची मुदत आहे.

एकरी उत्पादनामधील घटीमुळे शेतकऱ्यांचे व साखर कारखानदारीचे नुकसान होत आहे. ऊस शेती किफायतशीर होऊन गाळप हंगाम जास्त दिवस चालवायचा असेल तर उसाचे एकरी उत्पादन वाढ करणे हे अपरिहार्यच आहे. हे ओळखून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या निव्वळ नफ्यामधून एक कोटीची तरतूद ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले होते.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने राज्यातील सर्वप्रथम नोंदणी करणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांना या रकमेचे अनुदान दिे जाणार आहे. त्यानंतर ते अनुदान बंद होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित साखर कारखान्याच्या सहमतीसह लवकरात लवकर अर्ज द्यावेत. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना देणे सुलभ होईल, असे आवाहन बँकेने केले आहे. यासंबंधीचे विशिष्ट नमुन्यातील अर्ज गावोगावच्या विकास सेवा संस्थांमधून उपलब्ध होणार आहेत.

...अशी असेल अनुदान योजना

‘व्हीएसआय’ने हेक्टरी २५ हजार खर्च निश्‍चित केला आहे. यापैकी ९ हजार २५० अनुदान ‘व्हीएसआय’कडून मिळणार आहे. संबंधित साखर कारखान्याकडून ६ हजार ७५० व शेतकऱ्याचा हिस्सा नऊ हजार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

SCROLL FOR NEXT