Vegetable Market Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : वांगी, बटाटा, कांदा, हिरवी मिरचीचा दर वाढला की कमी झाला, जाणून घ्या एका क्लिकवर

Kolhapur Vegetable Rate : कोल्हापुरात मागच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला बाजारात काही अंशी चढउतार पहायला मिळत आहे.

sandeep Shirguppe

Vegetables Rate Kolhapur : कोल्हापुरात मागच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला बाजारात काही अंशी चढउतार पहायला मिळत आहे. या आठवड्यात फळभाज्यांचे दर ४० रुपये किलोपर्यंत खाली आले; तर इंदुरी बटाटा ४५ रुपये किलोपर्यंत गेला. हेळवी कांदा ३५ रुपये किलो होता, तो आता ५० रुपये किलोने विक्री सुरू आहे.

लसूण दर ८० ते ९० रुपये पाव किलो असा वधारला आहे. दोन ते तीन दिवस पावसाची रिपरिप सुरू झाल्याने कोथिंबीर आणि मेथीची पेंडी २० रुपयांपर्यंत गेली असून शेपू आणि पोकळा मात्र १० रुपयांवर स्थिरावला आहे. श्रावण सुरू असल्याने केळीची पाने, आळूची पाने यांची वाढती मागणी कायम आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो दर रुपयांत)

हेळवी कांदा ५०, बटाटा ४५, हिरवी पापडी शेंग ४०, सिमला मिरची ४०, पिकॅडो मिरची ४०, हिरवी मिरची ४०, हिरवी वांगी ४०, जांभळी वांगे ३०, टोमॅटो २०, बिनीस ४०, वाल शेंग ३०, पडवळ ४०, भेंडी ४०, तोंदली ४०, श्रावण घेवडा ४० ते ५०, बेळगावी गाजर ३० ते ४०, उसावरील शेंग ४०.

पालेभाज्यांचे दर (प्रति पेंडी रुपयांत)

कोथिंबीर २०, मेथी २०, शेपू १०, पालक १०, पोकळा १०, तांदळी १०, कांदापात २०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: गाळप हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींची आंदोलनाची घोषणा, महाराष्ट्र- कर्नाटकातील संघटना एकवटल्या

Soybean Rate: देशातील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता ?

Sugarcane Harvesting Workers: ऊसतोड मजुरांना मिळणार मूलभूत सुविधा; साखर कारखान्यांना सरकारचे कडक निर्देश

Silk Farming : रेशीम शेतीत उद्योजकतेच्या संधी

Farmers Demand: उसाला प्रति टन सहा हजार रुपये दराची मागणी

SCROLL FOR NEXT