Team Agrowon
टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशा स्थानिक नावांनी ओळखले जाते.
ओसाड जमिनीवर, शेतीत, रस्त्यांच्या कडेने टाकळा ही वनस्पती उगवलेली आढळून येते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो.
टाकळ्याच्या पानांची भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.
इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यांसारख्या त्वचाविकारांमध्ये ही वनस्पती गुणकारी मानली जाते.
टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर असते.
टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये वापरली जाते. त्वचा विकारांत पानांची भाजी देतात व बिया वाटून लोप लावला जातो.
पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला यामध्ये टाकळीच्या पानांचा रस मधातून दिला जातो. त्यामुळे आराम मिळतो.