Kharif Season: तविक्रमगड तालुक्यात दमदार पावसामुळे लावणीच्या कामांनी वेग धरला होता. लावणी झालेल्या भातरोपांनी तग धरल्याने बळीराजा जोमात आहे. .विक्रमगड तालुक्यात ८६ गावगाड्यांतील ७,५५७ हेक्टर क्षेत्रामध्ये भातपीक घेतले जाते. त्यासाठी सुधारीत भात वाणांचा वापर केला जातो. पण जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाला विलंब झाल्याने लावणीची कामे खोळंबली होती. .Rain Deficit in Vidarbh: अकोला, बुलडाणा, वाशीममध्ये पावसाची तूट.मध्यंतरीचा काळ सोडला तर चालू सप्ताहामध्ये पावसाने दमदार सुरुवात केल्याने लागवडीच्या कामांनीही शेवटचा टप्पा गाठला आहे. विक्रमगड तालुक्यात लागवडीचे कामे पूर्ण होत आली आहेत. .Kingaon Rainfall: पावसाची हुलकावणी, आता संकटात पेरणी.सध्या तालुक्तात गरवार भातपीकांमध्ये सुवर्णा, मसुरी, जया भातपिकांची वाण (भाताची जात) मोडली जातात. या भातपिकांची लागवड केल्यास पेरणीपासून १२५ ते १६० दिवसांत दर्जेदार पिकाची लागवड केली जात आहे..चांगल्या उत्पादनाची आशाशेतकऱ्यांनी रोहिणीच्या प्रारंभालाच पेरण्यांच्या कामांना प्रारंभ केला होता. त्यानंतर पावसाच्या अनियमितपणामुळे पुढील पेरण्या उशिराने झाल्या. मात्र, सध्या विविध भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात जवळपास ७० टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली असून चांगले उत्पादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.