Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा १५०.४६ टीएमसीवर पोहोचला आहे. यामध्ये ८९.३६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. गतवर्षी याच तारखेला उपयुक्त पाणीसाठा ७८.४० टीएमसी होता.
अलीकडच्या काही दिवसांत पावसाचा वाढलेला जोर व नगर, नाशिक भागांतील प्रकल्पांमधून जायकवाडीच्या दिशेने सुटलेल्या पाण्यामुळे जायकवाडीतील पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा मंगळवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास ४०.९४ टीएमसीवर पोहोचला होता.
जो प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठाच्या तुलनेत ५३.४१ टक्के होता. त्याचवेळी जायकवाडी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ६७.०२ टीएमसीवर पोहोचला होता. निम्न दुधना प्रकल्पात एकूण ५.६३४ टीएमसी तर २.०१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. येलदरी प्रकल्पात एकूण पाणीसाठा १६.०६ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ११.६० टीएमसी इतका झाला होता. सिद्धेश्वर प्रकल्पात एकूण पाणीसाठा ८.१३७ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २.१४ टीएमसी झाला होता.
माजलगाव प्रकल्पात एकूण पाणीसाठा ४.६१२ टीएमसी झाला असला तरी प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहे. मांजरा प्रकल्पात एकूण पाणीसाठा ३.८८ टीएमसी इतका झाला होता. त्यामध्ये २.२२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. पेनगंगा प्रकल्पात ३३.२०२ टीएमसी एकूण तर उपयुक्त २२.०८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. मानार प्रकल्पात एकूण पाणीसाठा ५.१८८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ४.८८ टीएमसी झाला होता.
निम्न तेरणा प्रकल्पात २.०९४ टीएमसी एकूण तर १.०४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. विष्णुपुरी प्रकल्पात २.५११ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला होता. तर २.४१ टीएमसी उपयुक्त पाण्यासाठी समावेश होता. सीना कोरेगाव प्रकल्पात २.१९७ टीएमसी पाणीसाठा झाला असून आत्ताकुठे हा प्रकल्प हळूहळू मृत साठ्यातून बाहेर पडताना दिसतो आहे. या प्रकल्पात ०.०४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता.
जायकवाडीत आवक आणखी वाढली
जायकवाडीत गोदावरी नदीतून येणाऱ्या पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. २६ ऑगस्टला सकाळी ६ वाजता जायकवाडीत ७१,११५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सकाळी दहा वाजता ती वाढून ९३ हजार ३३८ क्युसेकवर पोहोचली. सायंकाळी सहा वाजता ६९ हजार २८५ क्युसेकवर आली. सोमवारी (ता. २७) सकाळी पुन्हा ती वाढून ९३ हजार ३२८ क्युसेकवर गेली. दुपारी १२ वाजता पुन्हा कमी होत ८४ हजार ४४६ क्युसेकवर आली. तर दुपारी दोन वाजता ८४ हजार ४४१ क्युसेकने जायकवाडीत पाण्याची आवक सुरू होती. त्या वेळी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ६९.५९ टीएमसीवर तर उपयुक्त पाणीसाठा ४३.५३ टीएमसीवर पोहोचला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.