Killari Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Killari Sugar Mill: ‘किल्लारी’ तीन लाख टन ऊस गाळप करणार; आमदार पवार

Abhimanyu Pawar: केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने, आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने किल्लारी साखर कारखान्याचे अडीच हजार टन गाळप क्षमतेपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

Latur News: केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मोठ्या अडचणीतून किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप क्षमता आधुनिकीकरणास प्रतिदिन साडेबाराशे टनांवरून प्रतिदिन अडीच हजार टन विस्तारीकरण कामाची नवीन मशिनरीसह यंदाच्या गाळपासाठी पूर्ण क्षमतेने सज्जा झाला आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना गाळपासाठी सुरू करण्याचे प्रयत्न असून हंगामात कारखान्याचे तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.कारखान्याची गाळप क्षमता आधुनिकीकरणास विस्तारीकरण कामाची नवीन मशिनरी उभारणी प्रारंभ व पूजनाच्या कार्यक्रमात रविवारी (ता. ६) बोलत होते.

दत्तात्रय पवार गुरुजी व अॅड. परीक्षित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. साखर आयुक्तालयातील सहसंचालक (प्रशासन प्रवीण फडणीस, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार पवार यांनी दूरध्वनीवरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

किल्लारी भागातील शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू होणे आवश्यक होते. यात कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचे काम खूप आव्हानात्मक होते. सर्वांच्या सहकार्यामुळेच कारखाना आज पुनज्जिवीत होवू शकला. यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे परिसरातील साखर कारखानेही सुरळीतपणे चालवण्याचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही. मशिनरी उभारणी कामे संबंधित एजन्सीने वेळेत पूर्ण केल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. श्री. फडणीस व व श्री. जाधव यांनी कारखान्याचा लेखाजोखा मांडत आमदार पवार यांच्या अथक प्रयत्नामुळे हा कारखाना नव्याने सुरू झाल्याचे सांगितले.

या वेळी संतोष बेंबडे, सुजित शास्त्री, व्हीएसआयचे जय गोरे, नम्रता कुपाडे, योगेश बिल्ली, डी. एल. पतंगे, तुकाराम पवार, श्रीराम पाटील, बळीराम पाटील, युवराज बिराजदार, बालाजी निकम, जयपाल भोसले, गणेश माने, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर बालकुंदे, ईश्वर दंडगुले, सतीश भोसले, गोविंद भोसले, हर्सूल देशमुख यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी सभासद, व्यापारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT