Daund Sugar Mill: दौंड शुगर कारखाना ‘एआय’ प्रकल्प राबविणार

Sugarcane AI Project: दौंड शुगर कारखाना चालू वर्षी कार्यक्षेत्रातील ५ हजार हेक्टर क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीद्वारे ऊसशेती करणार आहे. या उपक्रमासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शन पुरवले जाणार असून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे.
Daund Sugar Factory
Daund Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News: दौंड शुगर कारखाना चालू वर्षी कार्यक्षेत्रातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) प्रणाली राबवणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी केली. खुटबाव (ता. दौंड) येथे तालुक्यात सर्व प्रथम ऊस शेतीसाठी ए.आय. प्रणाली राबविणाऱ्या महेंद्र थोरात यांच्या शेतीमध्ये कारखान्याच्या वतीने बुधवारी (ता. २५) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे ए.आय. प्रणाली राबविण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांनी स्वतः भरावेत. दौंड शुगर कारखाना ६७५० रुपये परताव्याच्या अटीवर देणार आहे. उर्वरित ९२५० रुपये महाराष्ट्र शासन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट भरणार आहे.

Daund Sugar Factory
Ajinkyatara Sugar Mill: अजिंक्यतारा कारखान्याला ‘भारतीय शुगर्स’चा पुरस्कार

या प्रणालीसाठी ठिबक सिंचन महत्त्वाचे असते. ठिबक सिंचनसाठी एकरी ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १० हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांनी भरावेत. उर्वरित ३५ हजार रुपये कारखाना बिनव्याजी परताव्याच्या अटीवर देणार आहे.’’

अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्र्स्ट, बारामतीचे संचालक प्रतापराव पवार यांनी शेतीमध्ये ए.आय. तंत्रज्ञान राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षी महाराष्ट्रातील शेतीमध्ये ए.आय. प्रणाली राबविण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही श्री. जगदाळे म्हणाले.

Daund Sugar Factory
Daund Sugar Factory: ‘दौंड शुगर’कडून पहिला हप्ता प्रति टन २८०० रुपये वर्ग

शेतकरी महेंद्र थोरात म्हणाले, की ए.आय. प्रणाली राबविल्यामुळे माझी शेती सध्या अभ्यास केंद्र बनली आहे. ११ महिन्यांपूर्वी लागवड केलेला आडसाली उसाला‌ सध्या २७ ते २८ कांड्या आलेल्या आहेत. एकरी १२५ टन उसाचे उत्पादन निघेल असा अंदाज आहे. या प्रणालीमुळे वेळ, पैसा, खते, पाणी, श्रम, औषधे यांची हमखास बचत होते. बदलत्या काळानुसार हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने अवगत करणे गरजेचे आहे.

या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी गायकवाड, ऊस अधिकारी दीपक वाघ, शेतकी अधिकारी संजय काकडे, ऊस विकास‌ अधिकारी संदेश बेनके, गटप्रमुख विकास थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, प्रशांत थोरात, दीपक होले व शेतकी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com