Sugarcane Cultivation : औसा तालुक्यातील ऊस क्षेत्रात वाढ

Sugarcane Farming : पावसाच्या जलसिंचनामुळे ऊस पीक जोमात असून, उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गतवर्षी ५ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होती.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon
Published on
Updated on

Latur News : यंदाच्या कृत्तिका नक्षत्रात दमदार पावसामुळे औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे मॉन्सूनपूर्व मशागतीला अडथळा झाला असला तरी उसाच्या पिकाला भरघोस फायदा झाला आहे.

पावसाच्या जलसिंचनामुळे ऊस पीक जोमात असून, उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गतवर्षी ५ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होती. ती यंदा वाढून १० हजार ७४७ हेक्टरवर पोचली आहे.

कारखान्याच्या तयारीबाबत साई शुगरचे चेअरमन राजेश बुके यांनी सांगितले की, यंदा प्रतिएकर ऊस उत्पादन ५० ते ६० टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांचा गाळप हंगाम एक महिना वाढण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकरी जगदीश पाटील चिंचोलीकर यांनी सांगितले की, यंदाचा मे महिन्यातील पाऊस ऊस पिकासाठी वरदान ठरला आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation Delay: मे महिन्यातील तीव्र उन्हामुळे ऊस लागवडीत खोडा

उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तालुक्यातील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले, की वाढत्या ऊस लागवडीमुळे कारखान्याची गाळप क्षमता २ हजार ५०० मेट्रिक टनांनी वाढवली असून, ऊस तोडीसाठी २५ हार्वेस्टरची आणि त्यांना लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था केली आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation Policy: दौंड शुगरचे ऊस लागवड धोरण जाहीर

किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय संचालक संतोष बेंबडे म्हणाले, नवीन यंत्रसामग्री बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ऊस तोडीसाठी २० हार्वेस्टर ऊस वाहतुकीसाठी ७० ट्रक, ७० मिनी ट्रॅक्टर आणि ५० बैलगाड्यांची व्यवस्था केली आहे.

प्रतिदिन गाळप क्षमता ४ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात येत आहे. औसा आणि निलंगा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राचे बॅक वॉटरचे क्षेत्र जवळपास दहा ते बारा किलोमीटर असून, त्या परिसरातील दोन्ही बाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com