Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : बारामतीच्या जिरायती भागात खरीप पेरणीच्या कामांना वेग

Kharif Season : जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, अंजनगाव, जळगाव सुपे, खराडेवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपूर, उंडवडी कडेपठार, जराडवाडी साबळेवाडी, शिर्सुफळ परिसरात मागील आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती.

Team Agrowon

Baramati News : तालुक्याच्या जिरायती भागात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. या पेरणीमध्ये बाजरी, मका, उडीद, मूग तसेच चारा पिकांचा समावेश आहे. जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, अंजनगाव, जळगाव सुपे, खराडेवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपूर, उंडवडी कडेपठार, जराडवाडी साबळेवाडी, शिर्सुफळ परिसरात मागील आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती.

जसा जमिनीला वाफसा येईल, तशी पेरणी कामांनी वेग घेतला आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलाच्या साह्याने पेरणी होत आहे. तर मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी सुरू आहे.

उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी जमिनीची पूर्वमशागत करून ठेवली होती. गेल्या वर्षी खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला होता. त्यामुळे बाजरीसह कडधान्य पिकले नव्हते. परिणामी, वर्षभर कुटुंबाला खाण्यासाठी लागणारी बाजरी बाजारात विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.

यंदा मात्र वरुणराजाने वेळेत सुरुवात केल्याने शेतकरी सुखावले आहेत. परिसरात बाजरीसह पेरण्यांच्या कामांनी वेग घेतला आहे. विशेष म्हणजे पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यामध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे अक्षरशः भाडेतत्त्वावर पेरणीसाठी बैलमालक व ट्रॅक्टरमालकाकडे नंबर लागले आहेत.

कारण वाफसा आलेले रान, पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा पेरणीसाठी वाफसा येण्याची प्रतीक्षा करावी लागते. तसेच पेरणी रखडली तर पिकाच्या काढणी देखील उशिराच होत असते. त्यामुळे उशिराचे पिकाची कणसे पाखरे फस्त करतात. असा शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पेरणीच्या कामांची लगबग वाढल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत आहे.

मजुरांची टंचाई

नुकत्याच झालेल्या पावसानंतर काही शेतकरी उसाची लागण, गुलछडी लागवड करण्याचे कामे सुरू केली आहे. तसेच अनेक महिला व पुरुष रोजंदारीवर कामाला बारामती व कुरकुंभ एमआयडी जात आहेत. तसेच एकाच वेळी पेरणीसह लागवडीची कामे सुरू झाल्यामुळे मजूरटंचाई निर्माण झाली आहे.

पुरुषाला पाचशे रुपये मजूर दिली जाते. महिलांना अडीचशे रुपये रोज आहे. मात्र चालू रोजंदारीपेक्षा आम्ही अधिकचे पैसे देऊन देखील मजूर मिळत नाही. अशावेळी आम्ही मजूर तालुक्याच्या बाहेरून आणत आहोत, अशी स्थिती आहे.
- गजानन भापकर, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Milk Union Naming: ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध संघ’ असे नामकरण

US India Trade Deal: अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांवर परिणामाची भीती

Election Campaign: पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या निधनाचे प्रचारावर सावट

Farmer Success Story: भांगे- पाटील यांच्या हुरड्याची दिल्लीपर्यंत ओळख

Baramati Agro Sugar Factory: ऊस गाळपात बारामती अॅग्रो साखर कारखाना आघाडीवर

SCROLL FOR NEXT