Kharif Sowing : मराठवाड्यात १६ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season : राज्यात गुरुवार (ता. २०)पर्यंत २७ लाख ३८ हजार ७८१ हेक्टरवर पेरणी झाली असताना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात त्यापैकी १६ लाख २० हजार ५८५ हेक्टरवर पेरणी आटोपली होती.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात गुरुवार (ता. २०)पर्यंत २७ लाख ३८ हजार ७८१ हेक्टरवर पेरणी झाली असताना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात त्यापैकी १६ लाख २० हजार ५८५ हेक्टरवर पेरणी आटोपली होती. गतवर्षी याच तारखेला राज्यात १ लाख ९७ हजार ९५६ हेक्टरवर, तर मराठवाड्यात केवळ ७४३१ हेक्टरवरच खरिपाची पेरणी झाली होती.

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २० लाख ९० हजार १९८ हेक्टर, तर लातूर कृषी विभागातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यांतील २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : खरीप पेरण्या सुरू, पण हमीभावाचा पत्ता नाही

या क्षेत्रापैकी १६ लाख २० हजार ५८५ हेक्टर क्षेत्रावर २० जून अखेरपर्यंत पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांतील ९ लाख ८१ हजार ७३७ हेक्टर, तर लातूर कृषी विभागातील चार जिल्ह्यांतील ६ लाख ३८ हजार ६४८ हेक्टरवर पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे. लातूर कृषी विभागात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २३ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर कृषी विभागात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४७ टक्के पेरणी आटोपली आहे.

गतवर्षी २० जून अखेरपर्यंत जालना, लातूर, धाराशिव तसेच हिंगोलीमध्ये पेरणीचे झाली नव्हती. तो विचार करता यंदाची पेरणी समाधानकारक असल्याचे मराठवाडा स्तरावर चित्र आहे. असे असले तरी काही ठिकाणी धो धो पडलेल्या पावसामुळे नसलेला वाफसा, त्यामुळे पेरणी थांबली तर काही ठिकाणी पेरणी योग्य नसलेला पाऊस यामुळे मराठवाड्यात काही भागात पेरणी थोडी दबकतच होताना दिसते आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : खरीप पेरण्या २४ टक्क्यांपर्यंत

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत मराठवाड्यात सर्वांत कमी म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३.१६ टक्के पेरणी झाली आहे. शिवाय हिंगोली जिल्ह्यात १६.१९ टक्के, परभणीमध्ये २२. ६३ टक्के धाराशिवमध्ये ३३.५३ टक्के, लातूरमध्ये ४४.०७ टक्के, बीडमध्ये ४५.४२ टक्के, जालन्यात ५४.०१ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४२.४० टक्के क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे. पेरणी झालेल्या काही भागांत पावसाने ८ दिवसांपेक्षा अधिक काळ दिलेल्या ओढीमुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्हानिहाय सरासरी व प्रत्यक्ष

पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष

छ.संभाजीनगर ६८४७१६ २९०३३०

जालना ६१९६९५ ३३४७२१

बीड ७८५७८६ ३५६८८६

लातूर ५९९४५६ २६४१९८

नांदेड ७६६८०९ २४२६९

धाराशिव ५०४७३६ १६९२१६

परभणी ५३४९०० १२१०६७

हिंगोली ३६१०५४ ५९८९८

आमच्या गावशिवारात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. ज्याची राहिली ते थांबले. दहा दिवसांपासून पाऊस नाही. पीक उगवलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. थोडा पाऊस आला तरी पिकांना आधार होईल. नसता दुबार पेरणी, लागवड करावी लागेल.
- ईश्‍वर सपकाळ, तिडका, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com